today horoscope Dainik Gomantak
Horoscope

Horoscope: वर्षाचा शेवटचा सप्ताहाचा प्रारंभ! 'या' राशींना मिळणार प्रगतीची नवी संधी, वाचा तुमचे भविष्य

horoscope December 29 2025: जाणून घ्या तुमच्या राशीचे भविष्य मराठीमध्ये

Akshata Chhatre

मेष: सप्ताहाची सुरुवात उत्साहाने होईल. कामाच्या ठिकाणी तुमची एखादी मोठी जबाबदारी यशस्वीपणे पूर्ण होईल. नवीन गुंतवणूक करण्यासाठी दिवस शुभ आहे. जोडीदाराचा सल्ला आज तुमच्यासाठी मोलाचा ठरेल.

वृषभ: बऱ्याच काळापासून रखडलेले आर्थिक व्यवहार आज मार्गी लागतील. जुन्या मित्राची अचानक भेट झाल्याने मन प्रसन्न होईल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, विशेषतः खाण्यापिण्याची पथ्ये पाळा.

मिथुन:आज तुमच्या बोलण्याने लोक प्रभावित होतील. नवीन प्रकल्पाची सुरुवात करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. भावंडांशी असलेले जुने मतभेद संपुष्टात येतील. प्रवासाचे योग आहेत.

कर्क: आज कामाचा ताण थोडा कमी जाणवेल. कुटुंबासोबत वेळ घालवल्याने मनाला उभारी मिळेल. एखादी जुनी इच्छा पूर्ण होऊ शकते. विद्यार्थ्यांना अभ्यासात नवीन दिशा सापडेल.

सिंह: सामाजिक क्षेत्रात तुमचा मान-सन्मान वाढेल. तुमच्या कष्टाची आज वरिष्ठांकडून दखल घेतली जाईल. नवीन जबाबदारी स्वीकारण्यासाठी तुम्ही सज्ज असाल. संध्याकाळी एखादी आनंदाची बातमी मिळेल.

कन्या: आज विखुरलेली कामे शिस्तबद्धपणे पूर्ण करण्यावर तुमचा भर असेल. नवीन काहीतरी शिकण्याची संधी मिळेल. अनावश्यक वादात पडणे टाळा. जोडीदाराचा पाठिंबा तुमच्या पाठीशी राहील.

तूळ: वैयक्तिक नात्यांमध्ये गोडवा वाढेल. नवीन खरेदीसाठी आजचा दिवस शुभ आहे. भागीदारीच्या व्यवसायात पारदर्शकता ठेवा, फायदा होईल. कलेच्या क्षेत्रात काम करणाऱ्यांना आज नवीन संधी मिळेल.

वृश्चिक: तुमच्या मार्गात येणारे अडथळे तुम्ही तुमच्या हुशारीने दूर कराल. विरोधक आज माघार घेतील. कायदेशीर प्रकरणांमध्ये सकारात्मक निकाल लागण्याची शक्यता आहे. तब्येत सुधारेल.

धनु: आज नशीब तुमच्या बाजूने आहे. अडकलेले पैसे अनपेक्षितपणे परत मिळतील. धार्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. प्रवासातून आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे.

मकर: कामाच्या ठिकाणी तुमचे स्थान अधिक भक्कम होईल. घरातील ज्येष्ठांच्या आरोग्यात सुधारणा होईल. नवीन घर किंवा वाहन घेण्याचे स्वप्न साकार होण्याच्या दिशेने हालचाली होतील.

कुंभ: आज तुम्हाला करिअरमध्ये नवीन आणि आकर्षक संधी चालून येतील. मित्रांचे सहकार्य लाभेल. तुमची सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. नवीन विचारांमुळे कामात प्रगती होईल.

मीन: कुटुंबाकडून एखादी आनंदाची बातमी समजेल. परदेशाशी संबंधित कामात यश मिळेल. अध्यात्वाकडे कल वाढेल. आर्थिक व्यवहारात मात्र थोडी सावधगिरी बाळगणे हिताचे ठरेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

MS Dhoni Jersey Number 7: थालाचा नवा अवतार! 7 नंबरची जर्सी बदलून धोनी रचणार नवा इतिहास? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय? VIDEO

Zodiac Personality Traits: गप्प बसतात पण सगळा हिशोब ठेवतात! 'या' 6 राशींचे लोक चालते-फिरते डिटेक्टिव्ह; चुटकीसरशी ओळखतात शत्रूचा डाव

Iran Israel War: मृत्यूच्या दाव्यानंतर काही क्षणातचं इराणच्या सर्वोच्च सुरक्षा प्रमुखाचं ट्विट! इस्रायलचा दावा खोटा की तेहरानचा 'माइंड गेम'?

VIDEO: 'लाईफ इज ब्युटीफुल इन गोवा!' हरमनप्रीत कौर अन् पेलेचा व्हिडिओ व्हायरल; किनाऱ्यावर रंगली गप्पांची मैफल

Pilgao: सफर गोव्याची! म्हादई समुद्राला मिळण्यापूर्वी लागणारे, छोटेसे टुमदार 'पिळगाव'

SCROLL FOR NEXT