Love Horoscope 24 November 2025 Dainik Gomantak
Horoscope

Horoscope: तुमचे प्रेम संबंध होणार मजबूत! 'या' 5 राशींसाठी आजचा दिवस आहे 'रोमान्स'ने भरलेला

Love Horoscope 24 November 2025: आजचा दिवस काही राशींसाठी विशेष आनंददायी, तर काहींसाठी मिश्र परिणाम घेऊन येणारा ठरू शकतो.

Sameer Amunekar

आजचा दिवस काही राशींसाठी विशेष आनंददायी, तर काहींसाठी मिश्र परिणाम घेऊन येणारा ठरू शकतो. विशेषतः ५ राशींवर प्रेमप्रसंग आणि रोमान्सची भन्नाट साथ राहणार आहे. पाहूया आजचे संपूर्ण १२ राशींचे भविष्य.

मेष

आज प्रेमाच्या बाबतीत अतिशय अनुकूल परिस्थिती आहे. जोडीदारासोबत गैरसमज दूर होतील. नवीन संबंधांना सुरुवात करण्यासाठीही योग्य दिवस.

वृषभ

कामातील ताण थोडा कमी होईल. रिलेशनमध्ये भावनिक जवळीक वाढेल. जोडीदाराकडून एखादे सरप्राईज मिळू शकते.

मिथुन

आज तुमचा आकर्षक स्वभाव कोणाच्याही मनावर ठसा उमटवेल. जोडीदारासोबत जवळीक वाढेल. अविवाहितांना प्रेमाची नवी चाहूल लागू शकते.

कर्क

घरगुती जबाबदाऱ्या वाढतील. प्रेमसंबंधात थोडी संयमाची गरज. जोडीदाराचे मन सांभाळा.

सिंह

आज तुमच्या व्यक्तिमत्वाभोवती एक वेगळा आकर्षणमंडल असेल. जोडीदार तुम्हाला भरपूर वेळ देईल. प्रेम व्यक्त करण्यासाठी सर्वोत्तम दिवस.

कन्या

काम आणि कुटुंब यात समतोल साधावा लागेल. प्रेमात अपेक्षा जास्त ठेवू नका. शांत राहा.

तुळ

आज वातावरण प्रेमाचे आहे. पार्टनरसह डेट प्लॅन करू शकता. नात्यातील गोडवा वाढेल.

वृश्चिक

मन थोडे अस्थिर राहू शकते. अनावश्यक वाद टाळा. संवादाने तणाव कमी होईल.

धनु

आज प्रेमसंबंधात सकारात्मक वारे वाहणार आहेत. जोडीदाराकडून प्रेम आणि साथ मिळेल. अविवाहितांसाठीही शुभ संकेत.

मकर

कामात यश दिसेल. प्रेमात शांतता आणि स्थिरता मिळेल. जोडीदार तुम्हाला प्रोत्साहन देईल.

कुंभ

कुंभ राशीच्या व्यक्तींना आज भावनिक समाधान मिळेल. जोडीदारासोबतचे नाते अधिक मजबूत होईल. नवीन रिलेशनची सुरुवातही संभव.

मीन

कल्पनाशक्ती आणि भावनिकता वाढेल. पार्टनरसोबत छोटेखानी रोमँटिक ट्रीप प्लॅन करू शकता. छान क्षण मिळतील.

आज रोमँससाठी सर्वात शुभ 5 राशी

मिथुन, सिंह, तुळ, धनु आणि कुंभ.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bicholim Accident: डिचोलीत ट्रकची मोटारसायकलला धडक; अपघातात मोटारसायकल चालक जखमी, इस्पितळात उपचार सुरू

Goa Live News: डिचोलीत 'नवा सोमवार' उत्सवाला प्रारंभ! श्री शांतादुर्गेच्या जयघोषात शहर भक्तीमय

Goa Accident: उसगाव-फोंडा मार्गावर चिरेवाहू ट्रक उलटला! चालक जखमी; काही वेळ वाहतूक कोंडी

Goa Road Closure: दाबोळी-वेर्णा वाहतूक वळविली, 29 पासून कार्यवाही; कुठ्ठाळी-चिखली महामार्गावरून अवजड वाहतूक

Jetty Project Goa: जेटीचे काम थांबवा, अन्यथा पणजीत मोर्चा; ग्रामस्थांचा इशारा; असोल्डा, शेळवण, होडर येथील प्रकल्पाला विरोध

SCROLL FOR NEXT