मेष
भाऊबहिणींचे नाते अधिक घट्ट होईल. घरात आनंदाचे वातावरण राहील. नोकरीत यशाची बातमी मिळू शकते. आज गुलाबाचा सुगंध वापरा नातेसंबंधात प्रेम वाढेल.
वृषभ
कौटुंबिक एकता आणि स्थैर्य वाढेल. भावाकडून मदत किंवा भेटवस्तू मिळू शकते. आर्थिक दृष्ट्या अनुकूल दिवस. भाऊबीजेला बहिणीला काहीतरी सुंदर भेट द्या.
मिथुन
मित्र आणि भावंडांकडून आनंददायी संदेश येतील. प्रवासाची शक्यता आहे. आरोग्याकडे थोडे लक्ष द्या. भाऊबीजेच्या दिवशी यमराज आणि यमुनेची पूजा शुभ ठरेल.
कर्क
आज भावनिक जवळीक वाढेल. दांपत्यांसाठी आणि कुटुंबासाठी आनंदाचा दिवस. भावाला अन्नदान किंवा मिठाई देणे पुण्यदायी ठरेल. घरात लक्ष्मीचा वास राहील.
सिंह
आत्मविश्वास उंचावेल. भावंडांशी मतभेद मिटतील. कामात प्रगतीची चिन्हे दिसतील. आज नारळ अर्पण केल्यास यश लाभेल.
कन्या
भावनिक स्थैर्य आणि घरातील समृद्धी वाढेल. भावंडांकडून अपेक्षित मदत मिळेल. भाऊबीजेला बहिणीला साडी किंवा मिठाई भेट द्या सौख्य वाढेल.
तूळ
आजचा दिवस कौटुंबिक स्नेह वाढवणारा आहे. भावाला तांदळाचा तिलक लावल्यास त्याच्या आयुष्यात आरोग्य आणि यश येईल. नवीन कामांसाठी शुभ दिवस.
वृश्चिक
नातेवाईकांकडून शुभ संदेश मिळेल. आर्थिक लाभाची शक्यता आहे. भाऊबीजेच्या तिलकावेळी बहिणीने गंध आणि तुळशी वापरल्यास पुण्य वाढेल.
धनु
आज घरात सणासुदीचा माहोल. नोकरीत किंवा व्यवसायात नवीन संधी मिळतील. भावाला भेटवस्तू देताना आपल्या मनातील कृतज्ञता व्यक्त करा.
मकर
आजचा दिवस कौटुंबिक आनंदाने भरलेला असेल. नातेवाईक एकत्र येतील. भाऊबहिणींचा स्नेह वृद्धिंगत होईल. आज गोडधोड खाणे शुभ.
कुंभ
आज मानसिक शांती आणि आनंद मिळेल. भावंडांमध्ये समजूतदारपणा वाढेल. यमद्वितीया निमित्ताने दीपदान केल्यास पितृकृपा मिळेल.
मीन
आज प्रेम, आपुलकी आणि जिव्हाळ्याचा दिवस आहे. घरात हसरा माहोल. भावाबरोबर वेळ घालवल्यास सुखद आठवणी निर्माण होतील.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.