Horoscope Dainik Gomantak
Horoscope

Horoscope: दुग्धशर्करा योग! मोहिनी एकादशीला शिव-विष्णूची साथ; सोमवारी 'या' भाग्यवान राशींचे नशीब उजळणार!

Horoscope 27 April 2026: २७ एप्रिल २०२६ रोजी आध्यात्मिक आणि ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून एक अतिशय शुभ काळ अनुभवायला मिळणार आहे.

Sameer Amunekar

२७ एप्रिल २०२६ रोजी आध्यात्मिक आणि ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून एक अतिशय शुभ काळ अनुभवायला मिळणार आहे. या दिवशी वैशाख शुद्ध एकादशी म्हणजेच 'मोहिनी एकादशी' असून जोडीला सोमवारचा वार आहे. भगवान विष्णू आणि देवाधिदेव महादेव या दोघांचीही कृपा संपादन करण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

ग्रहांची स्थिती आणि शुभ योग आजच्या दिवशी संध्याकाळी ६:१७ वाजेपर्यंत एकादशी तिथी असून रात्री ९:३६ वाजेपर्यंत 'ध्रुव योग' आणि रात्री ९:१९ वाजेपर्यंत 'पूर्वा फाल्गुनी नक्षत्र' राहणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार अशा संयोगामध्ये केलेल्या कार्याला सिद्धी प्राप्त होते. आचार्य इंदू प्रकाश यांच्या मते, आजचा दिवस काही राशींसाठी सुवर्णसंधी घेऊन आला आहे.

मेष आणि वृषभ राशीसाठी प्रगतीचे द्वार मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंदाची बातमी घेऊन येईल. नोकरीत वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामावर खुश राहतील, तर व्यापाऱ्यांना मित्रांच्या मदतीने नवीन कंत्राटे मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, वृषभ राशीच्या व्यक्तींनी आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवल्यास त्यांना गुंतवणुकीतून मोठा लाभ मिळू शकतो. वकिली क्षेत्रातील लोकांसाठी हा काळ विशेष फलदायी ठरेल.

मिथुन ते कन्या: कौटुंबिक सौख्य आणि आर्थिक लाभ मिथुन राशीच्या व्यक्ती आज ऊर्जेने रसरसलेल्या असतील, जुनी प्रलंबित कामे पूर्ण होतील. कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सामाजिक मेळाव्यांचा असेल, जिथे एखाद्या खास व्यक्तीच्या भेटीमुळे तुमची अडकलेली कामे मार्गी लागतील. सिंह राशीच्या जातकांसाठी स्थावर मालमत्ता किंवा नवीन वाहन खरेदीचे स्वप्न पूर्ण होण्याचे योग आहेत. कन्या राशीच्या व्यक्तींनी खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे, अन्यथा भविष्यात आर्थिक ओढाताण होऊ शकते.

तुळ ते धनु: बदल आणि यशाची शिखरे तुळ राशीच्या व्यक्तींना नोकरीत इच्छित स्थळी बदली मिळण्याची शक्यता असून आरोग्याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. वृश्चिक राशीच्या जातकांसाठी व्यवसायानिमित्त केलेले प्रवास फायदेशीर ठरतील. धनू राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस धार्मिक कार्यात व्यतीत होईल आणि अडकलेले धन परत मिळण्याचे संकेत आहेत.

मकर, कुंभ आणि मीन: कष्टाला मिळणार भाग्याची साथ मकर राशीच्या व्यापार क्षेत्रातील व्यक्तींसाठी आजचा दिवस बदलाचा असू शकतो. कुंभ राशीच्या लोकांसाठी आज मेहनतीचे फळ मिळण्याचा दिवस आहे, अचानक धनलाभाचे योग जुळून येत आहेत. मीन राशीच्या लोकांसाठी फायनान्स आणि सेल्स क्षेत्रात मोठे यश मिळण्याचे संकेत असून वैवाहिक जीवनात जोडीदाराकडून अपेक्षा पूर्ण होतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Parliament Fight Video: संसद बनली कुस्तीचा आखाडा! सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तुफान हाणामारी; लाथा-बुक्क्या अन् पाण्याच्या बाटल्यांनी हल्ला

Police Assault: कपडे फाडले, लाथाबुक्क्यांनी तुडवले, टोळक्याने केला हल्ला; ऑन-ड्यूटी पोलिसाला किन्नरांकडून बेदम मारहाण

IND vs NZ 5th T20: पाचव्या टी-20 साठी कर्णधाराची नवी चाल; 5 स्टार खेळाडू संघातून बाहेर, 'अशी' असेल टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग 11

Indian Super League: 2 बरोबरीनंतर एफसी गोवाला विजयाची आस; इंटर काशीविरुद्ध प्रशिक्षक गौरमांगी सिंग आशावादी

Railway Pass New Rules 2026: रेल्वे कर्मचारी, पेन्शनर्ससाठी खूशखबर! आता पासवर राजधानी, शताब्दी अन् दुरंतोने करता येणार प्रवास; वाचा नवा नियम

SCROLL FOR NEXT