Horoscope 17 May 2026 Dainik Gomantak
Horoscope

Horoscope: संडे ठरणार लकी! 'या' राशीच्या लोकांवर होणार पैशांचा आणि सन्मानाचा वर्षाव, प्रगतीचे मार्ग मोकळे होणार

Horoscope 17 May 2026: आज अधिक ज्येष्ठ शुक्ल पक्षाची प्रतिपदा तिथी असून रविवारचा दिवस आहे.

Sameer Amunekar

आज अधिक ज्येष्ठ शुक्ल पक्षाची प्रतिपदा तिथी असून रविवारचा दिवस आहे. आज रात्री ९ वाजून ४१ मिनिटांपर्यंत प्रतिपदा तिथी राहील, तर दुपारी २ वाजून ३२ मिनिटांपर्यंत कृत्तिका नक्षत्र असणार आहे. ग्रह-नक्षत्रांची ही बदलती स्थिती अनेक राशींसाठी अत्यंत शुभ संकेत घेऊन आली आहे. प्रसिद्ध ज्योतिषाचार्यांच्या मते, आजच्या दिवशी काही राशींना करिअरमध्ये मोठे यश मिळेल, तर काहींना आर्थिक लाभ आणि कुटुंबाची खंबीर साथ लाभणार आहे. चला तर मग जाणून घेऊया सर्व १२ राशींचे आजचे सविस्तर राशिभविष्य.

मेष आणि वृषभ: प्रगती आणि आनंदाचा काळ

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अत्यंत खास ठरणार आहे. माता आणि भावाकडून विशेष सहकार्य मिळाल्याने तुमचा पराक्रम वाढेल. सहकाऱ्यांच्या मदतीने तुमची कामे वेळेत पूर्ण होतील. विशेषतः महिलांना आज खरेदीमध्ये उत्तम सवलत मिळण्याची शक्यता आहे. जमीन-जुमल्याचे वाद तुमच्या बाजूने सुटतील आणि आर्थिक बाजू मजबूत राहील.

दुसरीकडे, वृषभ राशीच्या लोकांचा दिवस उत्साहात जाईल. घरात स्वच्छता किंवा नूतनीकरणाची कामे निघतील. व्यापारी वर्गाची निराशा संपून नवीन प्रोजेक्ट्स मिळतील. परदेशात राहणाऱ्या मित्रांकडून निमंत्रण येण्याची शक्यता आहे. वकिली क्षेत्रातील लोकांसाठी आजचा दिवस प्रगतीचा राहील.

मिथुन आणि कर्क: नवीन संधी आणि आर्थिक लाभ

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस नवी उमेद घेऊन येईल. उत्पन्नाचे नवीन स्त्रोत खुले होण्याची शक्यता आहे. मित्रांच्या मदतीने जुनी रखडलेली कामे मार्गी लागतील. अध्यात्माकडे कल वाढेल आणि जमीन व्यवहारातून फायदा होऊ शकतो.

कर्क राशीच्या व्यक्तींना आज व्यावसायिक क्षेत्रात अनुकूल वातावरण मिळेल. कुटुंबासोबत बसून एखाद्या मोठ्या समस्येवर तोडगा काढता येईल. मल्टीनॅशनल कंपनीत काम करणाऱ्यांसाठी आजचा दिवस प्रगतीकारक आहे. नवीन योजनांमुळे धनलाभ होईल आणि आरोग्य उत्तम राहील.

सिंह आणि कन्या: संयम आणि मेहनतीचे फळ

सिंह राशीच्या लोकांच्या मनात आज थोडी चलबिचल असू शकते, परंतु जोडीदाराशी संवाद साधल्यास मन हलके होईल. कोणतेही महत्त्वाचे निर्णय घाईगडबडीत घेऊ नका. भागीदारीतील व्यवसायात फायदा होईल आणि तुमच्या मनमिळावू स्वभावामुळे लोक तुमच्याकडे आकर्षित होतील.

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र राहील. सकारात्मक विचारांमुळे तुम्ही कठीण कामेही सहज पूर्ण कराल. फॅशन डिझायनिंग आणि वकिली क्षेत्रातील लोकांना आज उत्तम संधी मिळतील. वैवाहिक जीवनात गोडवा राहील.

तूळ आणि वृश्चिक: यश आणि नवीन व्यवसायाची सुरुवात

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. कौटुंबिक नात्यात मधूरता येईल आणि आर्थिक स्थिती सुधारेल. ऑफिसमध्ये नवीन जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडाल. विद्यार्थ्यांना शिक्षकांचे उत्तम मार्गदर्शन लाभेल. आरोग्याची बाजू उत्तम राहील.

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सर्वोत्तम आहे. जे लोक नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत आहेत किंवा नवीन नोकरीच्या शोधात आहेत, त्यांच्यासाठी हा काळ अत्यंत शुभ आहे. तुमच्या दूरदृष्टीमुळे व्यवसायातील अडचणी दूर होतील आणि आत्मविश्वास वाढेल.

धनु आणि मकर: नियोजन आणि सन्मानाचा दिवस

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक ठरेल. कठीण विषयांवर आज सकारात्मक चर्चा होऊ शकते. आज केलेली मेहनत भविष्यात मोठे फळ देईल. विद्यार्थ्यांना अभ्यासात भावाची मदत मिळेल. जोडीदारासोबत बाहेर जाण्याचा बेत आखू शकता.

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस योजना पूर्ण करण्याचा आहे. रखडलेल्या कामांमध्ये नशिबाची साथ मिळेल. समाजात मानसन्मान आणि प्रतिष्ठा वाढेल. आरोग्याच्या बाबतीत मात्र आज सावध राहण्याची गरज आहे, कोणत्याही त्रासाकडे दुर्लक्ष करू नका.

कुंभ आणि मीन: संवाद कौशल्य आणि मानसिक शांतता

कुंभ राशीच्या लोकांचे संवाद कौशल्य आज इतरांना प्रभावित करेल. परिणामांची चिंता न करता केलेल्या मेहनतीचे फळ नक्कीच मिळेल. ट्रान्सपोर्ट आणि वेब डिझायनिंग क्षेत्रातील लोकांना आज सरासरीपेक्षा जास्त नफा होईल. ऑनलाइन खरेदीकडे कल राहील.

मीन राशीच्या लोकांचे लक्ष आज पूर्णपणे कामावर केंद्रित असेल. सरकारी किंवा उच्च अधिकाऱ्यांकडून मोठा लाभ मिळण्याची शक्यता आहे. तब्येतीच्या तक्रारी दूर होतील. कुटुंबासोबत धार्मिक कार्यात सहभागी झाल्यामुळे मनाला शांतता लाभेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

तिसऱ्या अपत्याला 30 हजार तर चौथ्याला 40 हजार, आंध्र प्रदेश सरकारची अनोखी स्कीम; मुख्यमंत्र्यांनी केली मोठी घोषणा VIDEO

Rahu Gochar: नक्षत्र बदलून राहू करणार 3 राशींना मालामाल; मनासारखी नवीन नोकरी आणि मोठ्या पॅकेजची मिळणार ऑफर

Team India: क्रीडा जगतात मोठी खळबळ! टीम इंडियाच्या प्रशिक्षकावर लैंगिक शोषणाचा आरोप, थेट हकालपट्टीची कारवाई

Goa Dairy Subsidy: दूध उत्पादक आक्रमक! मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा रस्त्यावर उतरू; उत्तर गोवा शेतकरी संघटनेचा सरकारला थेट इशारा

Middle East War: एलपीजी, पेट्रोल अन् डिझेल आणखी महाग होणार? ट्रम्प-नेतान्याहूकडून मोठ्या हल्ल्याची तयारी; 'टार्गेट लिस्ट' बनवली

SCROLL FOR NEXT