Harshan Yog Dainik Gomantak
Horoscope

Harshan Yog June 2026: लव्ह लाईफमध्ये प्रेमाचा गुलमोहर बहरणार! 'हर्षण योग' ठरणार 5 राशींसाठी वरदान; धावपळीच्या आयुष्यातून मिळणार सुखाचा विसावा

Harshan Yog Astrology Benefits June 2026: जून महिना अर्धाही संपलेला नाही, तोच या महिन्यात आतापर्यंत अनेक शुभ आणि दुर्मिळ योग निर्माण झाले आहेत.

Manish Jadhav

Harshan Yog Astrology Benefits June 2026: जून महिना अर्धाही संपलेला नाही, तोच या महिन्यात आतापर्यंत अनेक शुभ आणि दुर्मिळ योग निर्माण झाले आहेत. याच शुभ योगांच्या मालिकेत आता अत्यंत फायदेशीर आणि तितकाच प्रभावशाली मानला गेलेला 'हर्षण योग' निर्माण होणार आहे. या योगाचा अत्यंत शुभ आणि सकारात्मक प्रभाव जून महिन्याच्या उत्तरार्धात अनेक राशींवर पाहायला मिळणार आहे.

ज्योतिषशास्त्रानुसार, हा अतिलाभकारी हर्षण योग गुरुवारी (18 जून 2026) संध्याकाळी 5 वाजून 35 मिनिटांनी सुरु होणार असून, तो शुक्रवारी (19 जून) दुपारी 2 वाजून 53 मिनिटांपर्यंत प्रभावी राहणार आहे. या विशेष कालावधीत काही ठराविक राशींना हर्षण योगाचा थेट आणि मोठा फायदा मिळण्याचे स्पष्ट संकेत आहेत. इतकेच नव्हे तर, हा योग संपल्यानंतरही या राशींच्या आयुष्यात कोणत्याही मोठ्या अडचणी किंवा समस्या निर्माण होणार नाहीत. चला तर मग जाणून घेऊया या हर्षण योगामुळे चमकरणारे 'ते' भाग्यवान राशींचे नशीब नक्की कसे असणार आहे.

या यादीत सर्वात पहिली राशी आहे 'कर्क'. कर्क राशीच्या जातकांसाठी हा काळ खूप अनुकूल आहे. तुमच्याकडे असलेल्या संयम आणि धैर्यामुळे तुम्ही एखाद्या खूप मोठ्या संकटात किंवा अडचणीत अडकण्यापासून स्वतःला अगदी सहज वाचवू शकाल. तसेच, तुमची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी तुम्ही भूतकाळात केलेले सर्व प्रामाणिक प्रयत्न आता यशस्वी होणार असून, धनाचा चांगला ओघ सुरु होईल.

याशिवाय, तुमच्या लव्ह लाईफमध्ये म्हणजेच जोडीदारासोबतचे प्रेम आणि जवळीक कमालीची वाढणार आहे. दुसरी भाग्यवान रास म्हणजे 'तुळ'. तुळ राशीच्या लोकांना त्यांच्या रोजच्या धकाधकीच्या आणि धावपळीच्या जीवनशैलीतून काही काळासाठी उत्तम आराम मिळणार आहे. या काळात तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत आणि जवळच्या लोकांसोबत अत्यंत आनंदी आणि दर्जेदार वेळ घालवू शकाल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, या योगाच्या प्रभावामुळे तुम्ही पैशांचे योग्य ठिकाणी केलेले गुंतवणूक नियोजन भविष्याच्या दृष्टीने अत्यंत फायदेशीर ठरेल.

यानंतर 'धनु' राशीच्या जातकांसाठी देखील हा हर्षण योग मानसिक शांतता घेऊन येणारा ठरेल. विवाहित जातकांना आपल्या जुन्या मित्रांसोबत पार्टी करण्याची किंवा एकत्र वेळ घालवण्याची संधी मिळेल, ज्यामुळे त्यांचा मानसिक ताण हलका होईल. जर तुम्ही अविवाहित असाल आणि बऱ्याच दिवसांपासून लग्नासाठी (Marriage) स्थळ शोधत असाल, तर या काळात तुमचे लग्न जमण्याचे किंवा नाते पक्के होण्याचे प्रबळ योग आहेत. सोबतीलाच तुम्हाला पैसे कमावण्याच्या काही नवीन आणि चांगल्या संधी उपलब्ध होतील.

शेवटी, 'मकर' राशीच्या लोकांबाबत बोलायचे झाल्यास, तुम्ही मनाशी ठरवलेली किंवा बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली कामे यशस्वीपणे पूर्ण झाल्यामुळे तुम्हाला एक वेगळीच मानसिक शांतता लाभणार आहे. यामुळे तुम्ही पूर्वीपेक्षा जास्त आनंदी आणि सकारात्मक राहाल. आरोग्याच्या आघाडीवर आता काळजी करण्याचे कारण नाही, कारण तब्येतीच्या जुन्या तक्रारी दूर होऊन तुम्ही चिंतामुक्त व्हाल. तसेच, तुमची आर्थिक घडी मजबूत करण्यासाठी तुम्ही घेतलेले कष्ट पूर्णपणे फळास येतील.

एकंदरीत, 18 आणि 19 जून रोजी येणारा हा हर्षण योग या चारही राशींच्या जीवनातील अंधार दूर करुन प्रगतीचा एक नवीन प्रकाश घेऊन येणारा ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Mega Project: कारापूर-सर्वण मेगा प्रकल्पावर 2 दिवसांत निर्णय, शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक; अधिकाऱ्यांना कागदपत्रे तपासण्याच्या सूचना

Indian Cricketers Ban: भारतीय क्रिकेटमध्ये आतापर्यंतचा सर्वात मोठा फ्रॉड! अंडर-19 वर्ल्ड कप स्टार अडकला जाळ्यात; 65 खेळाडूंवर बंदी

Goa Accident: गोव्यात अपघातांची धडकी भरवणारी आकडेवारी! 19 महिन्यांत 1107 जणांचा मृत्यू; दिवसाला दोन जीवांचा बळी

Shukra Gochar 2026: वैभव अन् संपत्तीचा कारक बदलणार चाल! शुक्राचे नक्षत्र गोचर 5 राशींसाठी ठरणार वरदान; धनाचा होणार वर्षाव

Madgaon Urban Bank: मडगाव अर्बनच्या ठेवीदारांना पुन्हा धक्का; पैसे मिळण्याची निश्चित तारीखच नाही! 4.20 कोटींच्या वसुलीसाठी 154 खटले

SCROLL FOR NEXT