Shadashtak Yog 2026 Dainik Gomantak
Horoscope

Shadashtak Yog 2026: गुरु-शनीची युती ठरणार घातक! 31 ऑक्टोबरला बनतोय अशुभ 'षडाष्टक योग'; 3 राशींच्या अडचणीत होणार वाढ

Guru Shani Shadashtak Yog 2026 Astrology: सध्या गुरु आणि शनी यांच्यात अशुभ मानला जाणारा 'षडाष्टक योग' तयार होत आहे. या योगामध्ये शनी ग्रह गुरुपासून आठव्या स्थानात, तर गुरु ग्रह शनीपासून सहाव्या स्थानात विराजमान आहे.

Manish Jadhav

Guru Shani Shadashtak Yog 2026 Astrology: वैदिक ज्योतिषात गुरु आणि शनी या दोन महत्त्वाच्या ग्रहांची स्थिती अत्यंत प्रभाव पाडणारी मानली जाते. सध्या गुरु आणि शनी यांच्यात अशुभ मानला जाणारा 'षडाष्टक योग' तयार होत आहे. या योगामध्ये शनी ग्रह गुरुपासून आठव्या स्थानात, तर गुरु ग्रह शनीपासून सहाव्या स्थानात विराजमान आहे. ग्रहांच्या या विशेष स्थितीमुळे काही राशींच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता असून, त्यांना करिअर, आर्थिक व्यवहार आणि कौटुंबिक जीवनात विविध आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. प्रामुख्याने कन्या, मकर आणि मीन या तीन राशींच्या जातकांना या काळात विशेष खबरदारी बाळगण्याचा सल्ला ज्योतिषांनी दिला आहे.

कन्या राशीच्या लोकांसाठी हा षडाष्टक योग आर्थिक अडचणी वाढवणारा ठरु शकतो. या काळात कोणत्याही व्यक्तीवर डोळे झाकून विश्वास ठेवणे अंगलट येऊ शकते. पैशांच्या देवाणघेवाणीत सावधगिरी बाळगावी, अन्यथा तुमचे पैसे दीर्घकाळासाठी अडकून पडू शकतात. कोणालाही उधारीवर पैसे देणे टाळावे. मकर राशीच्या जातकांनाही या ग्रहांच्या स्थितीमुळे आर्थिक चढ-उतारांचा सामना करावा लागेल. अनपेक्षित खर्च वाढल्याने बजेट कोलमडू शकते, ज्यामुळे मानसिक ताण निर्माण होण्याची शक्यता आहे.

मीन राशीच्या व्यक्तींनी या काळात अवाजवी खर्च टाळणे अत्यंत गरजेचे आहे. कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीत (Investment) मोठा धोका असू शकतो, त्यामुळे विचारपूर्वक आणि तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच निर्णय घ्यावेत. घाईगडबडीत घेतलेला कोणताही व्यावसायिक किंवा आर्थिक निर्णय मोठे नुकसान पोहोचवू शकतो. या तिन्ही राशींनी आपल्या करिअर आणि व्यवसायात संयम ठेवून काम करणे हिताचे ठरेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vasco Market Fire: दिवाळीच्या तोंडावर स्वप्नांची राखरांगोळी! वास्कोतील आगीत 150 विक्रेत्यांचे संसार उद्ध्वस्त

VIDEO: 'रायन रिकेल्टन, तुझी आई सिंगल आहे का?' चाहत्याच्या पोस्टरने वेधलं लक्ष; क्रिकेटपटूची रिअ‍ॅक्शन व्हायरल, पाहा व्हिडिओ

Netanyahu Against Protest: निवडणूक निकालानंतर इस्रायली निदर्शकांचा रस्त्यांवर तांडव, नेतन्याहूंच्या घराला घेराव; 'अरब-यहूदी' सरकारची होतेय मागणी VIDEO

Contractual Employees PF Benefits: कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही पीएफचा लाभ; 3,800 जणांची नोंदणी, सरकारकडून अंमलबजावणी सुरू

Kadamba Plateau Casting Yard Case: कदंब पठारावरील कास्टिंग यार्डचे भवितव्य न्यायालयाच्या हाती; निकाल राखीव

SCROLL FOR NEXT