Guru Nakshatra Gochar Dainik Gomantak
Horoscope

Guru Nakshatra Gochar 2026: अडकलेले पैसे मिळणार, मोठी डील फायनल होणार! देवगुरुच्या नक्षत्र परिवर्तनाने बदलणार 4 राशींचे भाग्य; नोकरदारांचेही अच्छे दिन

Guru Nakshatra Gochar Today: ज्योतिषशास्त्रात ज्ञान, बुद्धी आणि भाग्याचा कारक मानला गेलेला देवगुरु बृहस्पती 18 जून रोजी पुष्य नक्षत्रात प्रवेशकर्ता झाला.

Manish Jadhav

Guru Nakshatra Gochar Today: ज्योतिषशास्त्रात ज्ञान, बुद्धी आणि भाग्याचा कारक मानला गेलेला देवगुरु बृहस्पती 18 जून रोजी पुष्य नक्षत्रात प्रवेशकर्ता झाला. आता हा महत्त्वाचा ग्रह पुष्य नक्षत्राच्या दुसऱ्या पदात (चरणात) गोचर करणार आहे. यानंतर, 19 जुलै रोजी गुरुचा पुष्य नक्षत्राच्या तिसऱ्या पदात प्रवेश होईल. गुरुच्या या निरंतर नक्षत्र गोचरचा आणि पद बदलाचा देशातील सर्वच राशींवर मोठा प्रभाव पडणार आहे.

मात्र, प्रामुख्याने मेष, मिथुन, तुळ आणि मीन या चार राशींच्या जातकांसाठी हा काळ अत्यंत शुभ आणि लाभदायक ठरणार आहे. या लोकांना करिअर, व्यवसाय आणि आर्थिक आघाड्यांवर अभूतपूर्व यश मिळणार असून, त्यांच्या संपूर्ण जीवनशैलीत कमालीचे सकारात्मक बदल पाहायला मिळतील.

या ग्रहांच्या स्थितीमुळे मेष राशीच्या लोकांच्या जीवनात मोठे आर्थिक लाभ मिळण्याचे योग आहेत. गुरुचे पुष्य नक्षत्राच्या दुसऱ्या पदात येणे त्यांच्यासाठी वरदान ठरेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना पदोन्नती (Promotion) मिळण्याची दाट शक्यता असून, त्यांच्या उत्पन्नात मोठी वाढ होईल. मिथुन राशीच्या जातकांबद्दल बोलायचे झाले तर, त्यांना या काळात भाग्याची भक्कम साथ लाभणार आहे. कार्यक्षेत्रात किंवा व्यवसायात त्यांना प्रचंड आर्थिक नफा होईल. इतकेच नव्हे तर, अचानक धनलाभाचे योग आल्यामुळे आणि एखादी मोठी व्यावसायिक डील फायनल झाल्यामुळे त्यांचे मन अत्यंत प्रसन्न राहील. आरोग्याच्या दृष्टीनेही हा काळ त्यांच्यासाठी उत्तम राहील.

दुसरीकडे, तुळ राशीच्या व्यक्तींना गुरुच्या या गोचरामुळे नशिबाची पूर्ण साथ मिळणार आहे. विशेषतः विद्यार्थ्यांसाठी हा काळ अत्यंत अनुकूल आणि यशाचा ठरेल. स्पर्धा परीक्षा किंवा उच्च शिक्षणाची तयारी करणाऱ्यांना करिअरमध्ये पुढे जाण्याच्या उत्तम संधी मिळतील. या काळात तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि आर्थिक परिस्थिती आधीपेक्षा कितीतरी पटीने मजबूत होईल.

शेवटी, मीन राशीच्या लोकांसाठी गुरुचा हा नक्षत्र बदल त्यांच्या भौतिक सुख-सुविधांमध्ये प्रचंड वाढ करणारा ठरेल. या काळात कोणत्याही कामाचे योग्य नियोजन करून पावले टाकल्यास त्यांना हमखास यश मिळेल. करिअरमध्ये प्रगतीचे नवे टप्पे पार करत असतानाच, या राशीच्या व्यक्तींसाठी नवीन घर किंवा हक्काचे वाहन खरेदी करण्याचे अतिशय शुभ योग जुळून येत आहेत. एकूणच, गुरुचे हे पुष्य नक्षत्रातील गोचर या चार राशींच्या जीवनात समृद्धीची नवी पहाट घेऊन येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress Flag Controversy: काँग्रेसच्या झेंड्यावरुन पणजीत नवा वाद! महापालिका कर्मचाऱ्यांनी काढलेले झेंडे डॉ. अंजली निंबाळकरांनी पुन्हा लावले

Goa Jeweller Fraud: दागिने परत न करणाऱ्या सोनाराविरुद्ध 3 तक्रारी; 14 लाखांची फसवणूक, वास्को पोलिसात तक्रार

Supreme Court: "दुसऱ्या महिलेसोबत हॉटेलमध्ये काय करत होता?" बायकोनं जाब विचारताच नवरा थेट सुप्रीम कोर्टात; नेमकं प्रकरण काय?

'म्हज्यो दिवचलच्यो यादी' रवींद्र फोगेरींची स्मरणयात्रा

Couple Viral Video: पावसाची मजा झाली सजा! प्रेमात मग्न कपलसाठी 'खड्डा' ठरला विलन, भररस्त्यात तोंडावर पडले; व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT