Guru Chandal Yog Dainik Gomantak
Horoscope

Guru Chandal Yog: गुरु-चांडाल योगाचा अशुभ प्रभाव, तीन राशींची धाकधूक वाढली; पैशांची चणचण आणि आजारपण वाढणार

Guru Chandal Yog Effects 2026: ज्योतिष शास्त्रामध्ये ग्रहांच्या बदलत्या चालीला आणि त्यांच्या युतीला विशेष महत्त्व दिले गेले आहे.

Manish Jadhav

Guru Chandal Yog Effects 2026: ज्योतिष शास्त्रामध्ये ग्रहांच्या बदलत्या चालीला आणि त्यांच्या युतीला विशेष महत्त्व दिले गेले आहे. गेल्या वर्षी म्हणजेच 5 डिसेंबर 2025 रोजी देवगुरु बृहस्पती आणि छाया ग्रह राहु यांच्यातील दृष्टी संबंधामुळे 'गुरु चांडाल योग' निर्माण झाला होता. हा अत्यंत अशुभ मानला जाणारा योग येत्या 1 जून 2026 पर्यंत प्रभावी राहणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत राहु आणि गुरु एकत्र येतात किंवा त्यांच्यात दृष्टी संबंध तयार होतो, तेव्हा गुरु चांडाल योग निर्माण होतो.

सर्वसाधारणपणे या योगाचा सर्वच राशींवर नकारात्मक प्रभाव पडतो, ज्यामुळे कामात अडथळे येतात, यश मिळवण्यात अडचणी निर्माण होतात आणि व्यक्ती कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत चिंतेत राहते. सध्या हा योग अंतिम टप्प्यात असला तरी 1 जून 2026 पूर्वी तीन राशींच्या लोकांना याच्या नकारात्मक प्रभावातून सुटका मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे या काळात त्यांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.

या अशुभ योगाचा सर्वाधिक फटका बसणाऱ्या राशींमध्ये पहिली राशी म्हणजे वृषभ. वृषभ राशीच्या व्यक्तींना या काळात आपल्या मौल्यवान वस्तूंची विशेष काळजी घ्यावी लागेल, कारण एखादी महत्त्वाची वस्तू गहाळ झाल्यामुळे तुमची चिंता वाढू शकते. आरोग्याच्या आघाडीवर, पाठीच्या किंवा कंबरदुखीच्या त्रासातून तूर्तास आराम मिळण्याची चिन्हे नाहीत. आर्थिक चणचण भासत असलेल्या लोकांना पैशांच्या समस्येतून लगेच मुक्ती मिळणार नाही. तसेच, या काळात चुकीच्या ठिकाणी किंवा घाईघाईत गुंतवणूक केल्यास मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागू शकते. वाहन चालवताना अत्यंत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे, कारण दुखापत होण्याची शक्यता जास्त आहे.

दुसरी प्रभावित राशी म्हणजे कन्या. कन्या राशीच्या लोकांनी या काळात कोणताही निर्णय घेताना किंवा कोणतेही काम करताना विचारपूर्वक पावले टाकणे गरजेचे आहे; अन्यथा नको त्या नुकसानाला सामोरे जावे लागेल. आरोग्यामध्ये चढ-उतार पाहायला मिळतील, ज्यामुळे शारीरिक थकवा जाणवू शकतो. कौटुंबिक आघाड्यावर, घरातील सदस्यांच्या गरजा वेळेवर पूर्ण न केल्यामुळे कुटुंबात नाराजीचे वातावरण निर्माण होऊ शकते आणि तुम्हाला त्यांच्या रागाचा सामना करावा लागू शकतो. या संपूर्ण काळात तुमचे गुप्त शत्रू आणि विरोधक देखील जास्त सक्रिय राहतील, जे तुमच्या कामात अडथळे आणण्याचा प्रयत्न करतील.

तिसरी राशी म्हणजे धनु. धनु राशीच्या जातकांसाठी हा काळ काहीसा आव्हानात्मक असेल. जर घरात लहान मुले असतील, तर त्यांच्या आरोग्याविषयी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे, कारण त्यांची तब्येत बिघडण्याची शक्यता आहे. या काळात तुम्हाला पैशांच्या कमतरतेशी आणि आर्थिक विवंचनेशी लढा द्यावा लागू शकतो. नातेवाईक किंवा जवळच्या व्यक्ती तुमच्या कामात खोडा घालण्याचा प्रयत्न करतील, त्यामुळे त्यांच्यापासून सतर्क राहणे फायद्याचे ठरेल. आर्थिक गुंतवणुकीचा (Investment) विचार करत असाल, तर तूर्तास त्यातून लाभ मिळण्याची आशा नाही. तसेच, रस्त्यावर किंवा बाहेर कोणाही अनोळखी व्यक्तीशी वाद घालणे टाळावे, अन्यथा नाहक त्रासाला सामोरे जावे लागेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Indian Cricketers Ban: भारतीय क्रिकेटमध्ये आतापर्यंतचा सर्वात मोठा फ्रॉड! अंडर-19 वर्ल्ड कप स्टार अडकला जाळ्यात; 65 खेळाडूंवर बंदी

Goa Accident: गोव्यात अपघातांची धडकी भरवणारी आकडेवारी! 19 महिन्यांत 1107 जणांचा मृत्यू; दिवसाला दोन जीवांचा बळी

Shukra Gochar 2026: वैभव अन् संपत्तीचा कारक बदलणार चाल! शुक्राचे नक्षत्र गोचर 5 राशींसाठी ठरणार वरदान; धनाचा होणार वर्षाव

Madgaon Urban Bank: मडगाव अर्बनच्या ठेवीदारांना पुन्हा धक्का; पैसे मिळण्याची निश्चित तारीखच नाही! 4.20 कोटींच्या वसुलीसाठी 154 खटले

Goa POCSO Case: 10 वर्षांची सक्तमजुरी, दंड अन् आता सर्वोच्च न्यायालयात आव्हान, लैंगिक अत्याचार प्रकरणी पीडितेसह सरकारला नोटीस

SCROLL FOR NEXT