Diwali Horoscope 2025 Dainik Gomantak
Horoscope

Horoscope: घरात ऐश्वर्य आणि आनंदाचा वर्षाव, वातावरण अत्यंत मंगलमय राहील; दिवाळीच्या दिवशी कसा असेल तुमचा दिवस?

Diwali horoscope in marathi: जाणून घ्या दिवाळीच्या दिवशी काय सांगतंय तुमच्या राशीचं भविष्य

Akshata Chhatre

मेष
आजचा दिवस नव्या ऊर्जेने भरलेला आहे. व्यवसायात नवे करार होण्याची शक्यता आहे. दिवाळीच्या खरेदीत खर्च वाढेल पण मन समाधानाने भरलेले राहील. घरात ऐश्वर्य आणि आनंदाचा वर्षाव होईल. संध्याकाळी लक्ष्मीपूजन अवश्य करा.

वृषभ
लक्ष्मीदेवीची कृपा तुमच्यावर विशेष आहे. आर्थिक स्थैर्य वाढेल. घरात सणासुदीचे वातावरण राहील. व्यावसायिक कामात शुभ सुरुवात होऊ शकते. प्रियजनांकडून भेटवस्तू मिळतील. गोड पदार्थांचा आनंद घ्या पण आरोग्याची काळजी घ्या.

मिथुन
आज उत्सवाच्या वातावरणात मन आनंदी राहील. दीर्घकाळानंतर थकवा दूर होईल. कौटुंबिक एकत्रिकरण होईल. लक्ष्मीपूजनाच्या वेळी चांदीचा नाणे ठेवणे शुभ ठरेल. विद्यार्थ्यांना नवीन प्रेरणा मिळेल.

कर्क
घरातील वातावरण अत्यंत मंगलमय राहील. नातेवाईकांची भेट होईल. आर्थिक दृष्ट्या उत्तम दिवस आहे. सणाच्या निमित्ताने नवीन वस्तू खरेदी करण्याचा योग आहे. प्रेमसंबंधात गोडवा वाढेल. दिव्यांनी घर उजळवा आणि मनही उजळेल.

सिंह
दिवाळीचा हा दिवस तुमच्यासाठी यशाचा संदेश घेऊन येईल. कार्यक्षेत्रात प्रगती होईल. मित्रांकडून शुभवार्ता मिळू शकते. आर्थिक लाभ निश्चित आहे. लक्ष्मीपूजनात सुवर्ण किंवा तांब्याचे द्रव्य ठेवणे शुभ ठरेल.

कन्या
आजचा दिवस शुभतेने भरलेला आहे. कुटुंबातील सर्व सदस्यांसोबत आनंद वाटेल. आरोग्य उत्तम राहील. नवीन कामाची सुरुवात करण्यास उत्तम वेळ आहे. दिवाळीच्या रात्री तुलसीपाशी दीप लावल्यास धनलाभ होईल.

तूळ
लक्ष्मीदेवीचा विशेष आशीर्वाद मिळण्याचा दिवस! आर्थिक बाबतीत मोठा लाभ होण्याची शक्यता आहे. घरात शांतता आणि सौहार्द राहील. प्रेमसंबंध दृढ होतील. नवे वस्त्र परिधान करणे शुभ.

वृश्चिक
आजचा दिवस आल्हाददायक आहे. सणाचा आनंद कुटुंबासह साजरा करा. धनप्राप्तीची शक्यता आहे. लक्ष्मीपूजनाच्या वेळी लाल फुलांचा वापर करा. व्यवसायात नवी दिशा मिळेल.

धनु
आज नशिब तुमच्या बाजूने आहे. प्रवासाचे योग शुभ आहेत. सणाच्या खरेदीत आनंद मिळेल. मित्र आणि परिवारासोबत वेळ घालवण्याचा आनंद घ्या. दिवाळीच्या संध्याकाळी लक्ष्मीच्या नावाचा मंत्र जपा.

मकर
आजचा दिवस कार्यसिद्धीसाठी अनुकूल आहे. घरात मंगलकार्याची चिन्हे दिसतील. आर्थिक दृष्ट्या दिवस उत्तम. जुन्या कामांचा शेवट आणि नव्या कामांची सुरुवात करा. लक्ष्मीपूजनावेळी कुबेर मंत्र जपा.

कुंभ
आज मनात नवे विचार आणि सकारात्मकता भरलेली असेल. घरातील सजावट आणि दिव्यांच्या प्रकाशात आनंद अनुभवाल. लहान मुलांकडून सणाचा आनंद वाढेल. आर्थिक स्थैर्य वाढेल.

मीन
दिवाळीचा हा दिवस तुमच्यासाठी प्रेम, आनंद आणि समृद्धी घेऊन येईल. लक्ष्मीपूजनावेळी सुवासिक अगरबत्ती लावा आणि धनलाभाची कामना करा. जुने वाद मिटतील. आरोग्य चांगले राहील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

बागातील 'त्या' प्रकाराबाबत उत्कंठा वाढली! क्राईम ब्रँचकडून गुन्ह्याची नोंद; व्हिडिओतील टोळक्यापर्यंत पोलिस पोहोचले

VIDEO: "नुसते फटके मारुन चालत नाही!" बाबर आझमचा 'स्लो' खेळ अन् 'फास्ट' उत्तर; सोशल मीडियावर फुटले वादाला तोंड

Bihar Food Poisoning: सत्यनारायणाचा प्रसाद ठरला जीवघेणा! मुजफ्फरपूरमध्ये 100 हून अधिक जणांना अन्नातून विषबाधा; एकाच वेळी अख्खं गाव पडलं आजारी

IPL 2026 Points Table : राजस्थानला नमवून SRH चा गुणतालिकेत धमाका! मोठ्या उलटफेरासह टॉप-5 मध्ये एन्ट्री; मुंबई, चेन्नई आणि कोलकाताची अवस्था बिकट

IPL 2026: उष्णतेचा आयपीएल खेळाडूंवर परिणाम; रोहित शर्मा, विराट कोहली यांनाही त्रास; वाढत्या आर्द्रतेचा फटका

SCROLL FOR NEXT