Dhruv Yog 2026 Dainik Gomantak
Horoscope

Dhruv Yog 2026: अब्जाधीश होण्याचा मार्ग मोकळा? 'ध्रुव योगा'मुळे 4 भाग्यवान राशींवर होणार पैशांचा पाऊस; मिळणार कुबेराचा खजिना

Dhruv Yog June 2026: चालू वर्ष म्हणजेच जून 2026 मध्ये जुळून येणारा ध्रुव योग काही राशींसाठी अत्यंत खास आणि परिवर्तनाचा ठरणार आहे.

Manish Jadhav

Dhruv Yog June 2026: ज्योतिष शास्त्रामध्ये ध्रुव योगाचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आणि शुभ मानले जाते. या योगाची निर्मिती दर महिन्याला होत असली, तरी चालू वर्ष म्हणजेच जून 2026 मध्ये जुळून येणारा ध्रुव योग काही राशींसाठी अत्यंत खास आणि परिवर्तनाचा ठरणार आहे. येत्या 17 जून 2026 रोजी हा शुभ ध्रुव योग बनत असून, त्याचा सकारात्मक आणि शक्तिशाली प्रभाव याच दिवसापासून विशिष्ट राशींच्या जीवनावर दिसून येईल. हा योग बहुतांश सर्वच प्रकारच्या शुभ कार्यांसाठी अत्यंत फलदायी मानला जातो. ज्या व्यक्तींच्या पत्रिकेत हा योग येतो, त्यांच्या जीवनात आनंदाचे वातावरण निर्माण होते आणि ते नवनवीन यशोशिखरे सर करतात.

दृक पंचांगानुसार, 17 जून 2026 रोजी मध्यरात्री 12 वाजून 35 मिनिटांनी या ध्रुव योगाची सुरुवात होणार असून, याच दिवशी रात्री 8 वाजून 51 मिनिटांनी तो समाप्त होईल. या साधारण वीस तासांच्या कालावधीत निर्माण होणाऱ्या ऊर्जेमुळे प्रामुख्याने चार राशींच्या नशिबाला मोठी कलाटणी मिळणार आहे.

या शुभ योगाचा सर्वाधिक फायदा पृथ्वी तत्वाची पहिली राशी असलेल्या वृषभ राशीच्या जातकांना होणार आहे. 17 जूननंतर वृषभ राशीच्या लोकांच्या दैनंदिन कामात आणि व्यवसायात मोठी स्थिरता येईल. बऱ्याच दिवसांपासून रखडलेली कामे मार्गी लागतील, तसेच जुने मतभेद मिटून कौटुंबिक आणि सामाजिक नातेसंबंध अधिक घट्ट करण्याची उत्तम संधी तुम्हाला प्राप्त होईल.

वृषभ राशीप्रमाणेच अग्नी तत्वाची राशी असलेल्या सिंह राशीच्या जातकांसाठीही हा काळ भाग्योदयाचा ठरेल. सिंह राशीचे लोक आपल्या करिअरमध्ये किंवा नोकरीत एखादे मोठे आणि महत्त्वाचे ध्येय साध्य करण्यात यशस्वी होतील. तुमच्या वैवाहिक जीवनातील गोडवा वाढेल आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, जर तुम्ही एखाद्या जुन्या किंवा गंभीर आजाराने त्रस्त असाल, तर या काळात तुम्हाला त्यावर योग्य आणि अचूक इलाज मिळून आरोग्यात मोठी सुधारणा होईल.

दुसरीकडे, तूळ राशीच्या जातकांसाठी जून महिन्यातील हा योग आर्थिक सुबत्ता घेऊन येणार आहे. तूळ राशीच्या लोकांनी 17 जूननंतर कोणत्याही क्षेत्रात गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतल्यास, त्यांना त्यातून प्रचंड मोठा आर्थिक नफा मिळण्याचे संकेत आहेत. या काळात तुमची धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यांमध्ये रुची वाढेल, ज्यामुळे तुम्ही कोणत्याही चुकीच्या संगतीत किंवा वादात अडकण्यापासून स्वतःचा बचाव करु शकाल.

या तीन राशींशिवाय, पृथ्वी तत्वाची आणखी एक महत्त्वाची राशी असलेल्या मकर राशीच्या लोकांसाठी हा ध्रुव योग अतिशय लाभदायी सिद्ध होणार आहे. मकर राशीच्या जातकांची आर्थिक बाजू भक्कम होईल आणि त्यांच्या बचतीमध्ये मोठी वाढ होईल. उत्पन्नाचे (Income) नवे स्रोत निर्माण झाल्याने समाजात तुमचे पद, प्रतिष्ठा आणि मान-सन्मान वाढीस लागेल. एकंदरीत, 17 जून रोजी होणारा हा ध्रुव योग या चारही राशींच्या आयुष्यात प्रगतीचे नवे दरवाजे उघडणारा ठरेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Police Assault: कपडे फाडले, लाथाबुक्क्यांनी तुडवले, टोळक्याने केला हल्ला; ऑन-ड्यूटी पोलिसाला किन्नरांकडून बेदम मारहाण

IND vs NZ 5th T20: पाचव्या टी-20 साठी कर्णधाराची नवी चाल; 5 स्टार खेळाडू संघातून बाहेर, 'अशी' असेल टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग 11

Indian Super League: 2 बरोबरीनंतर एफसी गोवाला विजयाची आस; इंटर काशीविरुद्ध प्रशिक्षक गौरमांगी सिंग आशावादी

Railway Pass New Rules 2026: रेल्वे कर्मचारी, पेन्शनर्ससाठी खूशखबर! आता पासवर राजधानी, शताब्दी अन् दुरंतोने करता येणार प्रवास; वाचा नवा नियम

Under 23 Cricket: पहिल्या डावात आघाडी, तरीही गोव्याचा पराभव; ओडिशाने 125 धावांनी दिला धक्का

SCROLL FOR NEXT