Daily Horoscope Dainik Gomantak
Horoscope

Daily Horoscope: रवी योग आणि भरणी नक्षत्राची साथ ठरणार लाभदायक! 'या' राशींसाठी सोमवार अत्यंत खास; कामाच्या वेगासोबत विचारांचा समतोल साधा

Daily Horoscope 23 November 2026: सोमवार, 23 नोव्हेंबर 2026 रोजी कार्तिक शुक्ल चतुर्दशी असून रात्री 11.42 नंतर पौर्णिमा सुरु होत आहे.

Manish Jadhav

Daily Horoscope 23 November 2026: सोमवार, 23 नोव्हेंबर 2026 रोजी कार्तिक शुक्ल चतुर्दशी असून रात्री 11.42 नंतर पौर्णिमा सुरु होत आहे. भरणी नक्षत्र, वरियान योग आणि मेष राशीतील चंद्राच्या प्रभावामुळे आज कामाचा वेग आणि निर्णयातील ठामपणा जाणवेल. रवी योग आणि आडल योगाचा संयोग असल्याने नियोजनबद्ध पावले उचलल्यास दिवस फलदायी ठरु शकतो, मात्र दुपारी संवेदनशील काळ आणि राहू काळात महत्त्वाचे निर्णय टाळणे हिताचे ठरेल.

मेष: आत्मविश्वास आणि मतांतील ठामपणा आज तुमची जमेची बाजू असेल. हाती घेतलेली कामे वेगाने पूर्ण होतील आणि कुटुंब व मुलांच्या जबाबदाऱ्यांमध्ये वेळ जाईल.

वृषभ: मन थोडे संवेदनशील राहू शकते, त्यामुळे बोलताना संयम ठेवा. काहींचा कल अध्यात्माकडे राहील, तर आरोग्याची (Health) काळजी घेणे गरजेचे आहे.

मिथुन: मित्रमैत्रिणींचा सहवास आणि सुसंवाद दिवस उजळून टाकेल. महत्त्वाचे पत्रव्यवहार व भेटीगाठी यशस्वी होतील.

कर्क: कामाच्या ठिकाणी तुमच्या योगदानाची दखल घेतली जाईल. आर्थिक बाबी आणि जबाबदाऱ्यांमध्ये स्पष्टता ठेवून पुढे जा.

सिंह: तुमचा उत्साह आणि प्रभाव आज उठून दिसेल. रखडलेल्या कामांना गती मिळेल आणि सामाजिक मानसन्मान वाढण्याची शक्यता आहे.

कन्या: घाईघाईत आर्थिक किंवा मोठे निर्णय घेणे टाळा. कामाचा वेग सांभाळा, अटी-शर्ती तपासूनच व्यवहार करा आणि आरोग्याकडे लक्ष द्या.

तूळ: अनुकूल ग्रहमान लाभल्याने गुंतवणुकीचे नियोजन आणि नवीन उपक्रमांना चालना मिळेल. जुन्या गुंतवणुकीतून लाभ संभवतो.

वृश्चिक: ध्येयावर लक्ष केंद्रित झाल्याने कामे वेळेत व अचूक पूर्ण होतील. घर-ऑफिसच्या नूतनीकरणाचे किंवा बदलाचे विचार पुढे सरकतील.

धनु: ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाने मागील गुंतागुंत सुटण्यास मदत होईल. नशिबाची साथ आणि आध्यात्मिक बळामुळे प्रगतीचा मार्ग मोकळा होईल.

मकर: अतिआत्मविश्वास किंवा अधीरपणा टाळून अनुभवांचा आधार घ्या. अनुत्पादक गुंतवणुकीपासून दूर राहा आणि नात्यांतील जुने वाद उकरुन काढू नका.

कुंभ: कौटुंबिक वातावरणात आनंदाचे क्षण अनुभवता येतील. लहानसहान गोष्टींवरुन वाद टाळा; विद्यार्थी आणि मालमत्तेसंदर्भातील निर्णयांसाठी दिवस पोषक आहे.

मीन: करिअरमध्ये नवीन जबाबदाऱ्या आणि संधीचे संकेत आहेत. आर्थिक नियोजन आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या संतुलित राखल्यास लाभ होईल.

एकंदरीत, आजचा सोमवार वेगवान कृती आणि शांत विचारांचा समतोल साधण्याचा आहे; अचूक नियोजनाने दिवस सार्थकी लावा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shadashtak Yog 2026: सूर्य-चंद्राचा अशुभ योग! 'या' 3 राशींच्या नोकरी-व्यवसायात वाढणार अडचणी; आर्थिक नियोजन कोलमडणार?

Canada Shooting: कॅनडात रक्तरंजित थरार! शॉपिंग स्टोअरबाहेर भारतीय वंशाच्या जोडप्याची हत्या; परदेशात भारतीयांवर हल्ल्यांचे सत्र सुरुच

Maharashtrian Shepu Bhaji: शेपू आवडतो की नावडतो? या भाजीच्या प्रेमात पडाल, अशी आहे चवीची भन्नाट कहाणी

Gossip Culture: गॉसिप्स अर्थात रिकामटेकड्यांच्या उचापती; गोड बोलून गुपिते काढणाऱ्यांपासून सावध राहा!

'आता उठवू सारे रान...' मुलांना मोबाईलच्या विळख्यातून बाहेर काढण्याची वेळ आली!

SCROLL FOR NEXT