Horoscope 12 April 2026 Dainik Gomantak
Horoscope

Horoscope: रविवार ठरणार खास! सूर्यदेवाच्या कृपेने 'या' राशींचे चमकणार भाग्य; नोकरी आणि व्यवसायात मिळणार अभूतपूर्व यश

Horoscope 12 April 2026: ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांच्या नक्षत्रांच्या हालचालीवरून आपल्या दैनंदिन जीवनातील चढ-उतारांचा अंदाज लावला जातो.

Sameer Amunekar

ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांच्या नक्षत्रांच्या हालचालीवरून आपल्या दैनंदिन जीवनातील चढ-उतारांचा अंदाज लावला जातो. १२ एप्रिल, रविवार असून हा दिवस प्रामुख्याने सूर्यदेवाला समर्पित आहे. या दिवशी सूर्यदेवासोबतच भगवान विष्णू, माता दुर्गा आणि भैरवनाथांच्या उपासनेला विशेष महत्त्व दिले जाते. १२ एप्रिलचा हा दिवस काही राशींसाठी सुखाचे दिवस घेऊन येईल, तर काहींना सावध राहण्याची आवश्यकता आहे.

मेष, वृषभ आणि मिथुन: संयम आणि संधींचा काळ

मेष राशीच्या लोकांसाठी उद्याचा दिवस काहीसा आव्हानात्मक असू शकतो. मनात अस्वस्थता जाणवेल, त्यामुळे घाईघाईत निर्णय घेणे टाळा. वृषभ राशीच्या व्यक्तींना कामाच्या ठिकाणी नवीन संधी उपलब्ध होतील. आपल्या जुन्या सवयी सोडून काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न केल्यास मोठे यश मिळू शकते. तर मिथुन राशीच्या जातकांनी उद्या कामाचा अतिरिक्त ताण घेणे टाळावे. आरोग्याची काळजी घेत एका वेळी एकाच कामावर लक्ष केंद्रित करणे हिताचे ठरेल.

कर्क, सिंह आणि कन्या: आर्थिक लाभ आणि मानसिक संतुलन

कर्क राशीच्या व्यक्तींना अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. जुनी अपूर्ण स्वप्ने पूर्ण करण्यासाठी हा काळ योग्य आहे. सिंह राशीच्या जातकांनी उद्या मानसिक शांतता राखणे गरजेचे आहे. व्यवसायासाठी पालकांकडून आर्थिक मदत मिळण्याची चिन्हे आहेत. कन्या राशीच्या लोकांसाठी उद्याचा मंत्र 'आधी काम पूर्ण करा' हा असावा. कामात अति-परफेक्टपणा शोधण्यापेक्षा ते पूर्ण करण्यावर भर दिल्यास यश नक्की मिळेल.

तुळ, वृश्चिक आणि धनु: निर्णयक्षमता आणि प्रगती

तुळ राशीच्या जातकांनी उद्या स्पष्ट आणि धाडसी निर्णय घेण्याची गरज आहे. कुटुंबातील सदस्यांचा सल्ला तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. वृश्चिक राशीच्या लोकांनी कोणत्याही गोष्टीवर तातडीने प्रतिक्रिया देणे टाळावे. नात्यांमध्ये संवाद वाढवल्यास संबंध अधिक घट्ट होतील. धनु राशीच्या लोकांसाठी उद्याचा दिवस प्रगतीचा आहे. नोकरीत बदलाचे संकेत असून मान-सन्मानात वाढ होईल. रागावर नियंत्रण ठेवणे फायद्याचे ठरेल.

मकर, कुंभ आणि मीन: शिस्त आणि आरोग्याची काळजी

मकर राशीच्या व्यक्तींनी उद्या आपल्या बोलण्यात गोडवा ठेवावा. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल, मात्र खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. कुंभ राशीच्या जातकांनी केवळ योजना न आखता त्यांच्या अंमलबजावणीवर भर द्यावा. मेहनतीशिवाय यश मिळणे कठीण आहे. शेवटी मीन राशीच्या लोकांसाठी उद्याचा दिवस संमिश्र राहील. मन थोडे अशांत राहू शकते, त्यामुळे संयम पाळा. वाहन सुख मिळेल आणि बौद्धिक कार्यातून उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Iran Secrets Leak: इराण युद्धाचे सीक्रेट्स लीक? ट्रम्प सरकारकडून 50 हून अधिक अधिकाऱ्यांची 'पॉलीग्राफ टेस्ट'; पँटागॉनच्या इतिहासातील सर्वात मोठा तपास

Goa Crime: नातेवाईक महिलेसोबत भांडण अन्... तरुणाने स्वतःच्या पोटात चाकू खुपसून संपवलं आयुष्य, पोलिस तपास सुरू

Goa Crime: 11 वर्षांच्या शिक्षेला ब्रेक! अल्पवयीन विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी मोठी घडामोड; 60 वर्षीय आरोपीला सशर्त जामीन

कुस्तीच्या आखाड्यात जिंकली, पण आयुष्याच्या पटावर हारली! सासरच्या त्रासाला कंटाळून 3 लेकरांसह महिला पैलवानानं उचललं टोकाचं पाऊल; 2 मुलांचा मृत्यू, 1 गंभीर

Goa Sports: गोव्याचे खेळाडू पदकासाठी सज्ज; जम्मू-काश्मीरमध्ये रंगणार राष्ट्रीय सेपॅक टाकरो स्पर्धा

SCROLL FOR NEXT