zodiac signs today Dainik Gomantak
Horoscope

Horoscope: अडथळे होतील दूर! 'या' राशींना मिळेल भाग्याची आणि आरोग्याची साथ, वाचा राशी भविष्य

daily horoscope: जाणून घ्या तुमच्या राशीचे भविष्य

Akshata Chhatre

मेष: मंगळवार तुमच्यासाठी शुभ आहे. रखडलेली सरकारी कामे मार्गी लागतील. आज तुम्ही शारीरिकदृष्ट्या खूप सक्षम अनुभवाल. कोर्ट-कचेरीच्या कामात यश मिळण्याची दाट शक्यता आहे.

वृषभ: आज पैशांच्या व्यवहारात कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका. व्यवसायात गुंतवणूक करताना कागदपत्रे नीट तपासा. कुटुंबातील सदस्यांशी वाद होण्याची शक्यता आहे, त्यामुळे बोलण्यावर नियंत्रण ठेवा.

मिथुन: सामाजिक वर्तुळात तुमची प्रतिष्ठा वाढेल. नवीन लोकांशी झालेली मैत्री फायदेशीर ठरेल. जोडीदारासोबतचे संबंध मधुर राहतील. विद्यार्थ्यांसाठी अभ्यासात लक्ष केंद्रित करण्यासाठी उत्तम दिवस.

कर्क: काही दिवसांपासून सुरू असलेला तणाव आज कमी होईल. घरातील ज्येष्ठांकडून विशेष मार्गदर्शन मिळेल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. आर्थिक स्थिती समाधानकारक राहील.

सिंह: नोकरीच्या ठिकाणी तुमचे वर्चस्व सिद्ध होईल. विरोधक तुमच्या युक्तीपुढे माघार घेतील. नवीन योजनांवर काम सुरू करण्यासाठी दिवस चांगला आहे. आरोग्याची साथ उत्तम मिळेल.

कन्या: तुमची मेहनत आज रंगात येईल. नवीन घर किंवा वाहन घेण्याचे नियोजन करत असाल तर आज हालचाली होतील. अचानक धनलाभ होण्याचे योग आहेत. प्रवासाचे बेत यशस्वी होतील.

तूळ: जोडीदाराशी असलेले मतभेद आज संपुष्टात येतील. घरातील वातावरण उत्साही राहील. व्यापारी वर्गाला नवीन ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे. खाण्यापिण्याची विशेष काळजी घ्या.

वृश्चिक: तुमच्या राशीचा स्वामी मंगळ असल्याने आज तुम्ही खूप सक्रिय असाल. जुन्या समस्यांवर तोडगा काढण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. जमीन-जुमल्याच्या व्यवहारात लाभ होईल.

धनु: नशिबाची भक्कम साथ आज तुमच्या पाठीशी आहे. उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्यांना नवीन संधी मिळतील. अध्यात्माकडे कल वाढेल. आर्थिक आवक वाढल्याने मन प्रसन्न राहील.

मकर: नोकरीत पदोन्नती किंवा नवीन जबाबदारी मिळण्याचे संकेत आहेत. कामाचा व्याप वाढला तरी तुम्ही तो कौशल्याने हाताळाल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, थोडी विश्रांती घ्या.

कुंभ: नवीन काहीतरी शिकण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. मित्रांच्या मदतीने महत्त्वाचे काम पूर्ण होईल. खर्चावर नियंत्रण ठेवा. दूरच्या प्रवासाचे नियोजन यशस्वी होईल.

मीन: कुटुंबाकडून एखादी अत्यंत आनंदाची बातमी मिळेल. जुन्या गुंतवणुकीतून लाभ होऊ शकतो. परदेशाशी संबंधित कामात प्रगती होईल. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mercury Transit 2026: बुधाचा 'साऊथ टर्न'! 25 मार्चपासून 'या' राशींचे आयुष्य पालटणार, धनलाभासोबतच समाजात वाढणार मान-सन्मान; 'नेम-फेम'चा सुवर्णकाळ सुरु

Goa Drugs Case: तपासणीला गेले अन् 'माल' घेऊन आले! कैद्यांचा गांजा तस्करीचा कट गोवा पोलिसांनी हाणून पाडला; 344 ग्रॅम गांजा जप्त

RO RO Ferry: कोकणवासीयांसाठी खुशखबर! मुंबई ते विजयदुर्ग रो रो फेरी घेणार आणखी 2 थांबे; प्रवाशांसाठी मोठी सुविधा

Margao Municipality Recruitment Scam: मडगाव नगरपालिकेत 'नातेवाईक' भरती? 11 जागा परस्पर भरल्याचा आमदार सरदेसाईंचा खळबळजनक आरोप; सरकारला धरले धारेवर

Goa Escort Service Fraud: "गोव्यात दलालांची दादागिरी चालणार नाही!" मुख्यमंत्र्यांचा विधानसभेत कडक इशारा; 512 संशयास्पद वेबसाईट केल्या ब्लॉक

SCROLL FOR NEXT