Budhaditya Rajyog 2026 Dainik Gomantak
Horoscope

Budhaditya Rajyog 2026: व्यापाऱ्यांना मोठा नफा, नोकरदारांना पगारवाढ! बुधादित्य योग 4 राशींना करणार मालामाल; सुवर्णकाळाचा थरार

Budhaditya Rajyog Benefits 2026: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा बुद्धीचा कारक बुध आणि ग्रहांचा राजा सूर्य हे दोन्ही ग्रह एकाच राशीत एकत्र येतात.

Manish Jadhav

Budhaditya Rajyog Benefits 2026: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा बुद्धीचा कारक बुध आणि ग्रहांचा राजा सूर्य हे दोन्ही ग्रह एकाच राशीत एकत्र येतात, तेव्हा अत्यंत शुभ मानल्या जाणाऱ्या 'बुधादित्य राजयोगा'ची निर्मिती होते. आज म्हणजेच 15 जून रोजी सूर्य देव मिथुन राशीत गोचर करणार आहेत. बुध ग्रह आधीपासूनच आपल्या स्वतःच्या मिथुन राशीत विराजमान असल्याने, सूर्य आणि बुधाच्या या युतीमुळे मिथुन राशीत शक्तिशाली बुधादित्य राजयोग तयार होणार आहे.

सूर्याचे हे राशी परिवर्तन आज दुपारी 12 वाजून 58 मिनिटांनी होणार आहे. विशेष म्हणजे, बुध स्वतःच्या राशीत असल्यामुळे येथे 'भद्र राजयोग' देखील निर्माण होत आहे. बुध ग्रह येत्या 22 जून रोजी कर्क राशीत प्रवेश करेल, याचा अर्थ 15 जून ते 22 जून या कालावधीत हा बुधादित्य राजयोग राहील. या सात दिवसांच्या काळात अनेक राशींच्या जीवनात सुवर्णकाळ सुरु होणार असून त्यांना प्रचंड आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे.

मिथुन राशीमध्ये तयार होणारा हा बुधादित्य आणि भद्र राजयोग प्रामुख्याने मिथुन, सिंह, कन्या आणि तुळ या चार राशींसाठी अत्यंत भाग्यवान आणि फायदेशीर ठरणार आहे. या काळात या राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल आणि त्यांच्या करिअरमध्ये यशाचे नवे मार्ग खुले होतील. ज्या राशीमध्ये हा योग बनत आहे, त्या मिथुन राशीच्या जातकांसाठी हा काळ वरदानासारखा ठरेल. नोकरी करणाऱ्या लोकांना पदोन्नती (Promotion) आणि पगारवाढीची आनंदाची बातमी मिळू शकते, ज्यामुळे उत्पन्नाचे स्रोत वाढतील आणि आर्थिक स्थिती मजबूत होईल.

सिंह राशीच्या लोकांसाठीही हा बुधादित्य राजयोग अनेक आघाड्यांवर लाभ घेऊन येत आहे. त्यांना आपल्या कार्यक्षेत्रात किंवा करिअरमध्ये मोठे यश मिळेल. अचानक धनलाभाचे योग निर्माण झाल्यामुळे आणि कमाई वाढल्यामुळे मन अत्यंत प्रसन्न राहील. तसेच बऱ्याच काळापासून रेंगाळलेली किंवा अडकलेली कामे या काळात वेगाने पूर्ण होतील. कन्या राशीच्या जातकांना देखील या राजयोगाचा मोठा फायदा होणार आहे. नोकरी आणि व्यवसाय करणाऱ्या कन्या राशीच्या लोकांना त्यांच्या कामात प्रचंड यश मिळेल आणि व्यापारात नफा वाढण्याची पूर्ण शक्यता आहे.

शेवटची भाग्यवान राशी म्हणजे तुळ राशी होय. बुधादित्य आणि भद्र राजयोगाची निर्मिती तुळ राशीच्या लोकांसाठी अतिशय लकी ठरणार आहे. त्यांना प्रत्येक कामात यश मिळेल. उत्पन्नामध्ये (Income) लक्षणीय वाढ झाल्यामुळे त्यांची आर्थिक बाजू कमालीची सुधारेल आणि जुन्या आर्थिक विवंचनेतून त्यांची सुटका होईल. ग्रहांच्या या शुभ स्थितीमुळे या चारही राशींच्या जीवनात सुख-समृद्धीचे आगमन होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Hardik Pandya Birthday: कधीकाळी क्रिकेट किट घ्यायलाही नव्हते पैसे, मॅगी खाऊन काढले दिवस; आज टीम इंडियाचा स्टार ऑलराउंडर! हार्दिक पांड्याचा संघर्षमय प्रवास

Nana Patekar Death: नाना पाटेकर यांचा मृत्यू कशामुळे झाला? गोमेकॉच्या अहवालातून महत्त्वाची माहिती समोर

Nushrratt Bharuccha Health Update: 'पिक्चर अभी बाकी है…', अपघातानंतर नुसरत भरुचाची पहिली पोस्ट; PHOTO शेअर करत चाहत्यांना दिली हेल्थ अपडेट

Job Scam: 52 लाखांच्या फसवणूक प्रकरणाला नवे वळण! अजित शंखवाळकरचा पोलिस अधीक्षकासोबतचा फोटो चर्चेत

खरी कुजबुज: मुख्यमंत्री देणार 'नवरात्री गिफ्ट'?

SCROLL FOR NEXT