Surya Budh Yuti Dainik Gomantak
Horoscope

Surya Budh Yuti: "नशिबाचं चक्र फिरणार, पैशाचा पडणार पाऊस!" 7 मार्चला होणार मोठा चमत्कार; सूर्य-बुध युती 'या' 5 राशींना करणार मालामाल

Budhaditya Rajyog 2026: ग्रहांच्या या विशेष स्थितीमुळे 'बुधादित्य राजयोग' निर्माण होत असून याचा सकारात्मक प्रभाव पाच भाग्यशाली राशींवर पडणार आहे.

Manish Jadhav

Budhaditya Rajyog 2026: वैदिक ज्योतिषशास्त्रात सूर्य आणि बुध या दोन ग्रहांच्या युतीला अत्यंत शुभ मानले जाते. 7 मार्च 2026, शनिवार रोजी दुपारी 4 वाजून 29 मिनिटांनी सूर्य आणि बुध ग्रह एकाच अंशावर (0 डिग्री) येणार आहेत. ग्रहांच्या या विशेष स्थितीमुळे 'बुधादित्य राजयोग' निर्माण होत असून याचा सकारात्मक प्रभाव पाच भाग्यशाली राशींवर पडणार आहे. या राजयोगामुळे संबंधित जातकांचे केवळ नशीबच फळफळणार नाही, तर त्यांना आर्थिक लाभ, पदोन्नती आणि समाजात मानसन्मान मिळण्याचे प्रबळ योग आहेत.

मेष राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ करिअरमध्ये (Career) सुवर्णसंधी घेऊन येणार आहे. जे तरुण सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करत आहेत, त्यांना या काळात मोठे यश मिळू शकते. नशिबाची भक्कम साथ मिळाल्याने तुमच्या कामाचे सर्वत्र कौतुक होईल आणि धनलाभाचे नवीन मार्ग मोकळे होतील. नोकरीमध्ये नवीन जबाबदारी किंवा बढती मिळण्याची दाट शक्यता आहे.

मिथुन राशीच्या लोकांसाठी सूर्य-बुधाची ही युती वरदान ठरणार आहे. विशेषतः व्यापाऱ्यांसाठी हा काळ अत्यंत फायदेशीर राहील. जर तुम्ही कुठे गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर हा काळ तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे. या काळात तुमचे अडकलेले पैसे परत मिळतील, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती अधिक मजबूत होईल. तुमचे बिघडलेली कामे पुन्हा सुरळीत मार्गी लागतील.

सिंह राशीच्या जातकांसाठी बुधादित्य राजयोग आत्मविश्वासात प्रचंड वाढ करणारा ठरेल. तुम्हाला वडिलोपार्जित संपत्तीतून मोठा लाभ मिळण्याची चिन्हे आहेत. जे लोक राजकारणात सक्रिय आहेत, त्यांना एखादे मोठे पद किंवा महत्त्वाची जबाबदारी मिळू शकते. समाजात तुमचा दबदबा वाढेल आणि हा काळ तुमच्यासाठी सर्वार्थाने शुभ सिद्ध होईल.

तूळ राशीच्या व्यक्तींच्या उत्पन्नात या काळात मोठी वाढ होणार आहे. कमाईचे नवीन स्त्रोत निर्माण झाल्यामुळे तुमची आर्थिक चिंता दूर होईल. कार्यक्षेत्रात तुम्हाला वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य लाभेल, ज्यामुळे तुमचे प्रकल्प वेळेत पूर्ण होतील. आर्थिक गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे.

धनु राशीच्या लोकांसाठी हा राजयोग धाडस आणि पराक्रमात वाढ करणारा ठरेल. शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना किंवा शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या काळात उत्कृष्ट कामगिरी करता येईल. तुम्हाला धार्मिक प्रवासाचे योग असून कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. आर्थिकदृष्ट्या हा काळ प्रगतीचा असून तुमच्या मान-सन्मानात वाढ होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Explainer: उन्मुक्त चंद ते विजय शंकर, वाढती स्पर्धा की उपेक्षा? भारतीय खेळाडूंचा 'परदेशी लीग'कडे का वाढतोय कल?

Monsoon Update: मान्सून उशिरा येणार, पण गोव्यात मान्सूनपूर्व पावसाची बॅटिंग सुरूच राहणार

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा झटका! 8व्या वेतन आयोगाला उशीर; होणार लाखोंचे नुकसान, 'हे' आहे कारण

Tata Tiago 2026: 6 एअरबॅग्ज अन् 15 वर्षांची बॅटरी गॅरंटी; टाटाने अवघ्या 5 लाखांत आणली मिडिल क्लाससाठी बेस्ट कार, मिळतील 'हे' दमदार फीचर्स

Goa Politics: निवडणुकीत चुचकारायचे, नंतर विसरायचे! गोव्यात गेल्या 40 वर्षांपासून मराठी भाषेबाबत खेळलं जातंय घाणेरडं राजकारण!

SCROLL FOR NEXT