Zodiac predictions 2025 Dainik Gmantak
Horoscope

Lucky Zodiac Signs: 4 ऑगस्टचा सोमवार खास! 5 भाग्यवान राशींचे नशिब उजळणार; होणार लक्ष्मीचा कृपावर्षाव

Shravan Monday 2025: या दिवशी चंद्र वृश्चिक राशीत, सूर्य व बुध कर्क राशीत तर शुक्र व गुरू मिथुन राशीत राहणार आहेत. मंगळ कन्या राशीत राहून मेहनतीला ऊर्जा देईल

Sameer Panditrao

४ ऑगस्ट २०२५ रोजी दुसरा श्रावण सोमवार असून, हा दिवस ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत शुभ मानला जात आहे. यंदा या दिवशी ग्रह-नक्षत्रांची अनुकूल स्थिती काही राशींना आर्थिक, वैयक्तिक आणि व्यावसायिक क्षेत्रात नवे संधीचे दरवाजे उघडून देणारी ठरणार आहे.

या दिवशी चंद्र वृश्चिक राशीत, सूर्य व बुध कर्क राशीत तर शुक्र व गुरू मिथुन राशीत राहणार आहेत. मंगळ कन्या राशीत राहून मेहनतीला ऊर्जा देईल, तर शनि मीन राशीत स्थैर्य व दूरगामी योजना यांना पाठिंबा देईल. राहू कुंभमध्ये आणि केतू सिंह राशीत राहील.

या राशींसाठी दिवस विशेष लाभदायक ठरणार

वृषभ: घरगुती वातावरण सुखद राहील. गुंतवणुकीत फायदा आणि आर्थिक निर्णय यशस्वी ठरतील. नवीन व्यावसायिक संधी मिळतील.

मिथुन: संभाषणात यश आणि सर्जनशील कामांत कौतुक मिळेल. नवीन प्रकल्प किंवा अभ्यासक्रम सुरू करण्यास अनुकूल वेळ. प्रवासातून लाभ होण्याची शक्यता.

तूळ: नोकरीत पदोन्नती किंवा नवीन जबाबदारी मिळू शकते. संबंधांत गोडवा राहील. आर्थिक नियोजन यशस्वी ठरेल. सामाजिक सन्मान वाढेल.

मकर: कामात स्थैर्य आणि दीर्घकालीन योजनांना यश मिळेल. कुटुंबाचा पाठिंबा लाभेल. आरोग्य आणि आत्मविश्वास उत्तम राहील.

कुंभ: नवीन कल्पना प्रत्यक्षात उतरतील. उत्पन्नाचे नवीन स्रोत सापडतील. सर्जनशील क्षेत्रात विशेष प्रगती होईल.

या दिवसाचा सकारात्मक लाभ घ्यायचा असल्यास, भगवान शिवाचे पूजन, मंत्रजप आणि जलाभिषेक अवश्य करावं, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sub-Junior Aquatics Championships: गोव्याच्या पूर्वी नाईकचा राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत दमदार परफॉर्मन्स; 2 सुवर्ण, 1 रौप्य जिंकलं

Viral News: 11 लाख कोटी जमा; बेरोजगार युवकाच्या खात्यात जमा झाली 14 अंकी रक्कम, बँकेत चौकशी करताच झाला भ्रमनिरास

Goa Assembly Live: पेडणे तालुक्यातील धारगळ, पत्रादेवी, नगरपालिका क्षेत्रात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, आमदार आर्लेकरांची मागणी

Oben Rorr EZ Sigma: 175 किमी रेंज, जबरदस्त लूक… ओबेन रोर ईझेड सिग्मा बाईक भारतात लाँच; ओलाला देणार टक्कर

Beef Seized: कर्नाटकातून गोव्यात अवैध गोमांस तस्करी; मोले तपासणी नाक्यावर 620 KG बीफ जप्त Video

SCROLL FOR NEXT