10 April 2026 Horoscope Dainik Gomantak
Horoscope

Horoscope: शुक्रवारचा दिवस 5 राशींसाठी ठरणार 'लकी'; शिव योगाच्या शुभ संयोगाने होणार करिअरमध्ये प्रगती अन् धनलाभ

10 April 2026 Horoscope: आज १० एप्रिल २०२६, वैशाख कृष्ण पक्ष अष्टमी तिथी आणि शुक्रवारचा दिवस आहे.

Sameer Amunekar

आज १० एप्रिल २०२६, वैशाख कृष्ण पक्ष अष्टमी तिथी आणि शुक्रवारचा दिवस आहे. आजचा दिवस अनेक राशींसाठी भाग्योदयाचा ठरणार असून काही राशींना संयम बाळगण्याची गरज आहे. आज 'श्री शीतलाष्टमी' व्रत असून रात्री ११ वाजेपर्यंत शिव योग राहणार आहे. आचार्य इंदु प्रकाश यांच्या विश्लेषणानुसार, आज मकर आणि कुंभ राशीच्या लोकांसाठी यशाचे मार्ग खुले होणार आहेत, तर मिथुन आणि मीन राशीच्या व्यक्तींनी व्यर्थ वादात न पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

मकर आणि कुंभ: प्रगती आणि यशाचे योग

मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस उर्जेने भरलेला असेल. सरकारी कर्मचाऱ्यांना लाभाची शक्यता असून नवीन व्यवसायानिमित्त केलेले प्रवास फायदेशीर ठरतील. जोडीदाराच्या सहकार्यामुळे तुमचा उत्साह द्विगुणित होईल. दुसरीकडे, कुंभ राशीसाठी आजचा दिवस अत्यंत अनुकूल आहे. सामाजिक स्तरावर तुमची लोकप्रियता वाढेल आणि नोकरीत मोठ्या जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायातही सुवर्णसंधी प्राप्त होतील.

मिथुन आणि मीन: सावधगिरी बाळगण्याची गरज

मिथुन राशीच्या व्यक्तींना आज आर्थिक व्यवहारात नातेवाईकांकडून मदत मिळू शकते, मात्र नकारात्मक लोकांपासून दूर राहणे हिताचे ठरेल. व्यर्थ वादात पडल्यास मानसिक शांतता भंग होऊ शकते. मीन राशीच्या लोकांसाठीही आज संमिश्र दिवस आहे. रागावर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे, अन्यथा हाताशी आलेले काम बिघडण्याची शक्यता आहे. घाईघाईत कोणताही मोठा निर्णय घेणे टाळावे.

इतर राशींची स्थिती

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अनुकूल असून करिअरमध्ये मोठी यश मिळण्याची शक्यता आहे. वृषभ राशीच्या व्यक्तींना प्रिय व्यक्तीकडून भेटवस्तू मिळाल्याने मन प्रसन्न राहील. सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आत्मविश्वासाने भरलेला असेल, तर कन्या राशीच्या नोकरीपेशा लोकांना एखादी मोठी आनंदाची बातमी मिळू शकते. तुळ आणि वृश्चिक राशीच्या लोकांसाठी प्रवासाचे योग असून धनलाभाची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Agriculture: गोव्याचा पारंपरिक कृषी वारसा धोक्यात? नारळ प्रक्रिया आणि मीठ उत्पादनाला चालना देण्यासाठी सरकारकडे साकडे

Iran Celebration: "ट्रम्प यांच्या पतनाची सुरुवात झाली!", मध्यावधी निवडणुकीच्या निकालानंतर इराणमध्ये जल्लोष; हजारो लोक उतरले रस्त्यावर VIDEO

Viral Video: तुम्हाला दिवाळीत काय मिळालं? सोनपापडी की ड्रायफ्रूट्स? 'या' कंपनीच्या बॉसनं कर्मचाऱ्यांना थेट iPhone 16 गिफ्ट केला! नेटकरी म्हणाले, 'व्हॅकन्सी आहे का?'

America Sanctions 2026: निवडणुकीतील पराभवाचा राग भारतावर? ट्रम्पकडून भारतीय दाम्पत्यासह 9 कंपन्यांवर कठोर निर्बंध; इराणला मदत केल्याचा आरोप

Private Bus Safety: बसची क्षमता 48, पण प्रवासी तब्बल 140! म्हापशात कामगारांच्या जिवाशी खेळ; खासगी बस ताब्यात

SCROLL FOR NEXT