Union Budget 2022 Goa Dainik Gomantak
गोवा

अर्थसंकल्पात गोव्याच्या वाट्याला काय येणार? देशाची जीडीपी 8% राहण्याची शक्यता

दैनिक गोमन्तक

कोरोनाच्या दणक्यानंतर प्रभावी लसीकरणामुळे अर्थव्यवस्था बऱ्यापैकी सावरल्याने 2022-23 या नव्या आर्थिक वर्षात जीडीपी (एकूण देशांतर्गत उत्पन्न) आठ ते साडेआठ टक्क्यांदरम्यान राहील, असे गुलाबी चित्र आर्थिक पाहणी अहवालात रंगविण्यात आले आहे. (Union Budget 2022 Latest News)

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल (सोमवारी) अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी, कोविड संकटाच्या सावटाखाली 2021-22 या वर्षातील देशाच्या आर्थिक स्थितीचे चित्र दर्शविणारा आर्थिक पाहणी अहवाल संसदेच्या पटलावर मांडला. 442 पानांच्या या दस्तावेजामध्ये बेरोजगारीच्या (Unemployment) आकडेवारीचा मात्र तपशील नाही. सरकारच्या लवचिक दृष्टिकोनामुळे अर्थव्यवस्थेची वाटचाल कोरोनापूर्व स्थितीच्या दिशेने असून कृषी आणि उद्योग क्षेत्राचा विकासदर वाढल्याचाही दावा या अहवालात करण्यात आला आहे. मात्र, सर्वाधिक रोजगार देणारे सेवा क्षेत्र पुरेशा प्रमाणात सावरले नसल्याची अप्रत्यक्ष कबुली यात देण्यात आली आहे.

गोव्याला काय मिळणार?

गोवा (Goa) हे पर्यटन राज्य म्हणून ओळखले जाते. जगाच्या आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक गोव्याला फिरायला येतात. येथील बहुसंख्य लोक पर्यंटणावर आधारित व्यवसाय करतात. मात्र कोरोनामुळे या व्यावसायिकांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. मागील तीन वर्षात लॉकडाऊन, कोरोना निर्बंध आणि कोरोना संसर्गाच्या भीतीमुळे पर्यटकांनी गोव्याला पाठ दाखवली आहे. परिणामी येथील लोकांना नुकसान सहन करावे लागले आहे. आज (मंगळवारी) घोषित होणाऱ्या अर्थसंकल्पात गोव्याच्या वाट्याला काय येणार याकडे गोवेकरांचे लक्ष लागले आहे. गोव्याच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) काय पाऊले उचलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

बॉलीवूड, टॉलीवूडचा प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक जानी मास्टरला गोव्यात अटक, सहकारी महिलेचा 6 वर्षापासून लैंगिक छळ केल्याचा आरोप

Ratnagiri Crime News: स्वप्नात दिसला मृतदेह, सिंधुदुर्गातील तरुण पोहोचला पोलीस ठाण्यात; तपासात उघड झाली धक्कादायक माहिती

तम्नार प्रकल्प रखडणार! कर्नाटकचे शेपूट वाकडेच, सिद्धरामय्यांनी कळसा-भांडुराचा मुद्दा केला उपस्थित

रस्त्यांच्या अवस्थेवरुन काँग्रेस आक्रमक; दहा दिवसांत काम सुरु न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा

फोंड्यात 'हेडा गॅब्लर'चा प्रयोग; 125 वर्षापूर्वी लिहलेले नोर्वेजियन नाटककाराचे नाटक पाहण्याची संधी

SCROLL FOR NEXT