Goa Theft Dainik Gomantak
गोवा

Sancoale Theft: गोव्यात आणखी एक मोठी चोरी, सांकवाळ येथे फ्लॅट फोडला; 8.5 लाखांचे दागिने, महागडी घडयाळे लंपास

Zuarinagar Theft: वास्को येथील मांगोर हिल परिसरात राहणाऱ्या राज दुलारी राणा यांनी या संदर्भात वेर्णा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

Sameer Panditrao

वास्को: गोव्यात घरफोड्यांचे सत्र सुरूच आहे. झुआरीनगर-सांकवाळ येथे अज्ञात चोरट्यांनी एका बंद फ्लॅटचे कुलूप तोडून सुमारे ८.५ लाखांचा ऐवज चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी वेर्णा पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

वास्को येथील मांगोर हिल परिसरात राहणाऱ्या राज दुलारी राणा यांनी या संदर्भात वेर्णा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार,अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या झुआरीनगर येथील फ्लॅटच्या मुख्य दरवाज्याचे कुलूप तोडले आणि आत घुसून चोरी केली.

चोरट्यांनी घेतलेल्या ऐवजात दोन सोन्याच्या बांगड्या होत्या, ३० ग्रॅमचे मंगळसूत्र, दोन सोन्याच्या अंगठ्या, कानातल्या सुवर्णअलंकाराची जोडी तसेच दोन घड्याळांचा समावेश आहे.या चोरीमुळे परिसरात भीतीचे वातावरण झाले आहे.

या घटनेनंतर वेर्णा पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ३३१(१)(२) आणि ३०५(अ) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक महेश भोमकर करत असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंद शिरोडकर आणि मुरगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी गुरुदास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून विविध सूत्रांवर तपास सुरू केला असून, आरोपींचा मागोवा घेण्यासाठी स्वतंत्र पथक कार्यरत केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ashwin on Rohit Virat fitness: "आता वय वाढलंय तर...": रोहित आणि विराटबद्दल अश्विनचं वादग्रस्त विधान Watch Video

Gold Price Today: दिवाळीची धामधुम! सोने आणि चांदीचे भाव गगनाला भिडले की उतरले? जाणून घ्या

Goa Rain: ऐन दिवाळीत 'बळीराजा' संकटात! हातातोंडाशी आलेला घास पाण्यात; 5 दिवसांसाठी Yellow Alert जारी

Horoscope: दिवाळीच्या काळात राजयोगाची संधी, 'या' राशींवर देवी लक्ष्मीची विशेष कृपा; ग्रहांचा दुर्मिळ संयोग ठरणार फलदायी

Guhagar Accident: गुहागर-चिपळूण मार्गावर अपघात! रत्नागिरीकडे येणारा टेम्पो उलटला, रस्त्यावर विखुरले मासे; वाहतूक काहीकाळ ठप्प

SCROLL FOR NEXT