oil leakage Dainik Gomantak
गोवा

Vasco News: पंजाबमधील श्वानपथक ठरले कुचकामी; इंधनगळतीचे गूढ कायम

Vasco News: ११ दिवसांनंतरही प्रशासन अपयशी; दाबोळीवासी हवालदिल

गोमन्तक डिजिटल टीम

Vasco News: दाबोळी-चिखली व्हडलेभाट परिसरात झुआरी इंडियन ऑईल कंपनीच्या भूमिगत वाहिनीतून होणाऱ्या तेल गळतीला ११ दिवस उलटले, तरी अद्याप गळतीचे निश्‍चित ठिकाण शोधण्यात सरकारी यंत्रणांना यश आलेले नाही.

यासाठी पंजाबमधून श्वानपथक दाखल झाले असून आज सकाळपासून या पथकाने शोधकार्यास सुरवात केली; परंतु संध्याकाळी उशिरापर्यंत गळतीचा उलगडा झालाच नाही. मात्र, दोन दिवसांत उलगडा होईल, असे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

झुआरी इंडियन ऑईल टॅंकिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या भूमिगत इंधनवाहिनीतून गळती सुरू होऊन आज ११ दिवस झाले आहेत.

तरीही व्हडलेभाट परिसरातील विहिरीत व नाल्यांत पेट्रोल व डिझेलमिश्रित पाणी आढळल्याचे पंच नीलम नाईक यांनी सांगितले.

गळती शोधण्यासाठी विविध मशीन्सचा वापर केला जात असल्याची माहिती गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष महेश पाटील यांनी दिली.

झुआरी इंडियन ऑईल टँकिंग प्रायव्हेट लिमिटेडने माटवे-दाबोळी येथील इंधन वाहिनीतून गळती होणारे ठिकाण शोधण्यासाठी पंजाबमधून श्वानपथक मागवल्यानंतर ते बुधवारी सायंकाळी गोव्यात दाखल झाले.

आरोग्य तपासणी करा!

झुआरी इंडियन ऑईल कंपनीने येथील लोकांची रोज आरोग्य तपासणी करण्यासाठी डॉक्टर पाठवावेत. कारण इंधनाच्या वासामुळे स्वास्थ्य बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

त्यामुळे येथील लोकांची रोज आरोग्य तपासणी करण्यासाठी सुविधा उपलब्ध करावी, अशी मागणी येथील पंच नीलम नाईक यांनी केली आहे.

येथील नाले, विहिरी जलस्रोत नष्ट झाले असल्याने याला कारणीभूत असलेल्या दोषींवर कारवाई करावी, अशी मागणीही नाईक यांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India vs Pakistan: टीम इंडियाला हरवण्यासाठी पाकड्यांचा 'मास्टरप्लॅन', शोएब अख्तर, म्हणाला, 'त्या' फलंदाजाला 2 ओव्हर्समध्ये आउट करा

रामा काणकोणकर हल्ला प्रकरण; गुंड जेनिटोसह आठ जणांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

Goa Children Court: पोटच्या 20 वर्षीय मुलीचा खून करणाऱ्या बापाला जन्मठेप, आठ वर्षानंतर लागला निकाल

आम्ही देशप्रेमी, तू देशद्रोही! गोव्यात आणखी एका सामाजिक कार्यकर्त्याला धमकी, BJP नेत्याने धमकीचा फोन केल्याचा आरोप

Goa Live Updates: Goa Rain: पुन्हा पावसाचा इशारा!

SCROLL FOR NEXT