Zuari Car Accident Dainik Gomantak
गोवा

ओव्हरटेक करणं जीवावर बेतलं; भरधाव कार झुआरी पुलावरुन खाली कोसळली

वाहन चालकाने पुलावर ब्रेक मारल्याने त्याच्या खुणा रस्त्यावर दिसत असून ती उजव्या बाजूला वळल्याच्याही खुणा आहेत.

विलास महाडिक

पणजी : झुआरी पुलावरुन काल बुधवारी रात्री बाजूची रेलिंग तुटल्याने एक कार प्रवाशांसह नदीत कोसळून अपघात झाला आहे. अपघातानंतर झुआरी पुलावर शोधकार्य सुरु असून यासाठी नौदलाची मदतही घेतली जात आहे. मात्र मोठी दुर्घटना घडली आहे. अग्निशमन आणि आपत्कालीन कर्मचार्‍यांसह वेर्णा आणि आगशी पोलिसांकडून शोधकार्य सुरु होतं. नौदलाकडूनही आता बचावकार्यासाठी मदत घेतली जात आहे. आतापर्यंत कार शोधण्यात प्रशासनाला यश आलेले नाही.

आता या अपघाताबद्दल काही खुलासे समोर येऊ लागले आहेत. घटनेपूर्वी अपघातग्रस्त वाहनाच्या पुढे असलेल्या एका टॅक्सी चालकाने त्याचा वाहनाच्या साईड आरशामध्ये मागाहून येणारे हे वाहन पाहिले होते. त्याने दिलेल्या माहितीनुसार हे वाहन भरधाव वेगात होते आणि या वाहनाने एका टॅक्सीला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला असता या वाहनाने उजव्या बाजूला असलेल्या पुलाच्या कठड्याला धडक दिली. या धडकेने पुलाचा कठडा मोडून हे वाहन नदीत पडले. या वाहनात कितीजण होते याचा अंदाज लागला नाही.

दक्षिण गोवा वाहतूक पोलिस उपअधीक्षक धर्मेश आंगले यांनी दिलेल्या माहितीनुसार अपघाताची माहिती रात्री 1 वाजता आगशी पोलिस स्थानकाला मिळाली तर आपल्याला पोलिस नियंत्रण कक्षाकडून या घटनेची माहिती मिळाल्यावर ताबडतोब तेथे पोहोचलो. त्यापूर्वीच आगशी व वेर्णा पोलिस तसेच अग्निशमन दलाचे जवान पोहोचले होते. रात्रीपासून शोधकार्य सुरू होते मात्र काळोख असल्याने शोधकार्य सुरू ठेवण्यात अडचणी येत होत्या. दरम्यान तटरक्षक दल आणि नौदल डायव्हर्सशी संपर्क साधण्यात आला होता. हे वाहन लोटली येथून पणजीच्या दिशेने येत होते. या वाहन चालकाने पुलावर ब्रेक मारल्याने त्याच्या खुणा रस्त्यावर दिसत असून ती उजव्या बाजूला वळल्याच्याही खुणा आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT