Zuari Bridge  Dainik Gomantak
गोवा

Zuari Bridge : झुआरी पुल 'या' दिवशी वाहतुकीसाठी राहणार बंद

वाहतूक बोरी पुलावरून वळवणार; प्रवाशांसाठी फेरीबोटीची पर्यायी व्यवस्था

गोमन्तक डिजिटल टीम

Zuari Bridge Will Be Closed For Travel: कुठ्ठाळी येथील झुआरी नदीवरील नवीन पुल रविवारी, 30 ऑक्टोबर रोजी वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. पुलाचे निरीक्षण करण्यात येणार आहे. त्यामुळे पुल रविवारी वाहतुकीसाठी बंद राहिल.

झुआरी नदीवर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 17 वर राष्ट्रीय महामार्गावर कुठ्ठाळी ते आगशी दरम्यान हा नवा पुल बांधण्यात आलेला आहे. रविवारी, 30 ऑक्टोबर रोजी पहाटे 6 वाजल्यापासून ते सकाळी 9 वाजेपर्यंत हा पुल सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद असेल. डेक लेव्हलची नोंदणी आणि निरीक्षण करण्यासाठी या काळात हा पुल वाहतुकीसाठी बंद राहणार आहे.

त्यामुळे या काळात या मार्गावरील वाहतूक दुसऱ्या मार्गाकडे वळविण्यात आली आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 17 बी (नवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 566) वरील बोरी पुलावरून ही वाहतूक वळवण्यात येणार आहे. याशिवाय प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी झुआरी नदीतून कुठ्ठाळी ते आगशी अशी फेरीबोट सेवाही सुरू राहणार आहे.

दरम्यान, राज्य सरकारसाठी महत्त्वाकांक्षी ठरलेल्या या आठ पदरी पुलावरून नोव्हेंबरपर्यंत चौपदरी वाहतूक सुरू होईल अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यापुर्वी दिली होती.

प्रकल्पासाठी 1,436 कोटींचा खर्च

हा प्रकल्प एकूण 13 किलोमीटर लांबीचा आहे. याचे काम तीन टप्प्यात होत आहे. यात बांबोळी ते आगशी (8 किमी) आगशी ते कुठ्ठाळी (1.8 किमी), कुठ्ठाळी ते वेर्णा (4.3 किमी) या टप्प्यांचा समावेश आहे. यातील दुसऱ्या टप्प्यात हा 1 किमी लांबीचा हा पूल असून आठपदरी रस्त्याचे नियोजन आहे. या प्रकल्पासाठी 1,436 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. यातील पहिल्या चौपदरीकरणाचा टप्पा नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'माझ्या दारात संकट नाही, तर मला काय देणे-घेणे?' शतकापूर्वी सावरकरांनी कोरडे ओढलेली संकुचित मानसिकता आजही उभी

Budh Nakshatra Parivartan 2026: 8 ऑगस्टपासून 'या' राशींचे नशीब उजळणार; बुधाच्या नक्षत्र बदलाने यशाचे नवे मार्ग खुलणार

Under Secretary Recruitment: अवर सचिव भरतीला कोर्टाचा 'ब्रेक'; राज्य सरकारला दणका; 2 महिला अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा फेरविचार करण्‍याचा आदेश

36 Villages Without 4G 5G In Goa: हायस्पीड इंटरनेटपासून 36 गावे अद्याप दूर; खासदार तानावडेंच्‍या प्रश्‍‍नाला केंद्रीय संपर्क राज्‍यमंत्र्यांचे उत्तर

PM Surya Ghar Yojana: 'पीएम सूर्यघर' योजनेअंतर्गत 3,323 घरांवर 'सोलर पॅनेल'; केंद्र सरकारकडून मिळाली 22.58 कोटींची सबसिडी

SCROLL FOR NEXT