Nitin Gadkari Dainik Gomantak
गोवा

Zuari Bridge Tower: पर्यटन सौंदर्यात भर! झुआरी पूलावर 'आयफेल' सदृश्य 125 मीटर उंच मनोरा; नितीन गडकरींच्या हस्ते पायाभरणी

Zuari Bridge Tower Height 125 Meters: आयफेल टॉवरच्या धर्तीवर तयार करण्यात येणाऱ्या या 125 मीटर उंच मनोऱ्याचा पायाभरणी सोहळा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (23 मे) हस्ते पार पडला.

Manish Jadhav

पणजी: झुआरी नदीवर नव्याने उभारण्यात आलेल्या झुआरी पूलावर एक भव्य वेधशाळा मनोरा आकार घेणार आहे. आयफेल टॉवरच्या धर्तीवर तयार करण्यात येणाऱ्या या 125 मीटर उंच मनोऱ्याचा पायाभरणी सोहळा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (23 मे) यांच्या हस्ते पार पडला. या पायाभरणी सोहळ्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह राज्यातील बडे नेते उपस्थित होते.

काय म्हणाले नितीन गडकरी?

आयफेल टॉवरच्या धर्तीवर गोव्यात 125 मीटर मनोऱ्याची पायाभरणी सोहळा आज पार पडत आहे. झुआरी पूलावरील हा उंच मनोरा पाहण्यासाठी देश-विदेशातून लोक येथील. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर गोव्याच्या पर्यटनामध्ये भर पडले. गोव्याला (Goa) जागितक स्तरावर ओळख प्रदान करुन देण्यात हा प्रकल्प योगदान देईल, असे गडकरी म्हणाले.

दरम्यान, या प्रकल्पाची एकूण अंदाजित किंमत 270.07 कोटी रुपये असून, तो गोव्याच्या पर्यटनसौंदर्यात लक्षणीय भर घालणार आहे. या अत्याधुनिक वेधशाळा मनोऱ्यात विशेष आकर्षण असलेले कॅप्सूल लिफ्ट्स, 360 अंश फिरणारे उपहारगृह, आधुनिक कला दालन, कॅफेटेरिया तसेच दोन्ही बाजूंनी झुआरी नदीवरुन जाणाऱ्या ‘वॉकवे’ पुलांचा समावेश असेल.

दुसरीकडे, या अद्वितीय संकल्पनेमुळे पर्यटकांना झुआरी नदी, मांडवीचा संगम, मुरगाव बंदर आणि गोव्याच्या नैसर्गिक सौंदर्याचे अवलोकन एका उंच मनोऱ्यातून करता येणार आहे. सदर प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर गोवा हे केवळ समुद्रकिनाऱ्यांपुरते मर्यादित न राहता एक समृद्ध आणि बहुआयामी पर्यटनस्थळ म्हणून उदयास येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

पर्यटनवृद्धी अन् रोजगारसंधी

वेधशाळेच्या उभारणीमुळे स्थानिक पातळीवर पर्यटन, आतिथ्य, वाहतूक, किरकोळ विक्री व सांस्कृतिक उद्योग क्षेत्रांमध्ये नव्या रोजगार संधी उपलब्ध होणार आहेत. या प्रकल्पामुळे झुआरी पुलाचे रुपांतर केवळ वाहतुकीसाठीच्या माध्यमातून एका पर्यटन आकर्षणात होणार असून, गोव्यातील पर्यटनाला (Tourism) एक जागतिक दर्जाची ओळख मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Murder: नवऱ्यापासून झालेली मुलगी आवडत नव्हती; बॉयफ्रेन्डसोबत मिळून आईने 2.5 वर्षाच्या बाळाला संपवले, गोवा हादरला

Ashok Saraf: 'अशें, तुका कळूंक ना?' अशोक मामांच्या तोंडी पुन्हा प्रोफेसर धोंड; सोशल मीडियावर VIDEO तूफान व्हायरल

Viral Video: बंगळुरुत वाहतूक पोलिसाची दादागिरी! बाईकस्वाराला थप्पड मारतानाचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, 'ही तर वर्दीतील गुंडगिरी...'

Gujrat Politics: गुजरातमध्ये चाललंय काय? मुख्यमंत्री वगळता सर्वच्या सर्व 16 मंत्र्यांचा राजीनामा

Viral Post: कॅन्सर जिंकला! 'ही माझी शेवटची दिवाळी...' 21 वर्षीय तरुणाची भावूक पोस्ट; नेटिझन्सकडून 'चमत्कारा'साठी प्रार्थना

SCROLL FOR NEXT