Gulalotsav In Goa Dainik Gomantak
गोवा

Zambaulim Gulalotsav: हजारो गोमंतकीय करणार गुलालाची उधळण! गुलालोत्सवासाठी जांबावली सज्ज; धुळपेटीने होणार उत्सवाची सांगता

Gulalotsav In Goa: जांबावलीचा शिममोत्सव धुमधडाक्यात साजरा केला जात आहे. या शिमगोत्सवाची सुरवात बुधवारपासून झाली आहे.

Sameer Panditrao

सासष्टी: गोमंतकातील प्रसिद्ध असलेल्या जांबावली येथील श्री दामबाब देवस्थानात मंगळवार २५ मार्च रोजी हजारोंच्या संख्येने गोमंतकीय श्री दामबाब दैवतावर गुलालाची उधळण करणार आहेत. या गुलालोत्सवाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे, असे मठग्रामस्थ हिंदू सभेचे अध्यक्ष भाई ऊर्फ पांडुरंग नायक यांनी सांगितले.

यंदा जांबावलीचा शिममोत्सव धुमधडाक्यात साजरा केला जात आहे. या शिमगोत्सवाची सुरवात बुधवारपासून झाली आहे. गेले सहा दिवस अनेक धार्मिक विधी व सांस्कृतिक कार्यक्रम झाले. मंगळवारी शिमगोत्सवाचा प्रमुख व महत्त्वाचा दिवस असून संध्याकाळी ३.३० वाजता श्री रामनाथ देवाच्या मंदिराच्या प्रांगणात गुलालोत्सवाला सुरवात होणार आहे.

या गुलालोत्सवाला हजारोच्या संख्येने भाविक व भक्तगण हजर राहणार असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे आयोजक मठग्रामस्थ हिंदू सभेने सर्व तयारी केली आहे. शिवाय केपे पोलिस ठाण्याने वाहतूक व सुरक्षा राखण्यासाठीही सर्व तयारी केली आहे.

पहाटे श्री दामोदराची पालखी श्री रामनाथ मंदिराच्या प्रांगणात आणून ठेवली जाईल व दुपारी गुलाल उत्सवानंतर परत आपल्या मंदिरात निघणार आहे.

भाविकांना आवाहन

श्री दामोदर दैवतावर गुलाल उधळल्याशिवाय भक्तांनी गुलालोत्सवाला आरंभ करू नये व शिस्तीने श्रींचे दर्शन घ्यावे. तसेच केवळ लाल रंगाचाच गुलाल वापरावा, असे आवाहन भाई नायक यांनी केले आहे.

गुलालोत्सवानंतर रात्री ११ वाजता नवर देवाची वरात कार्यक्रम व १२ वाजता संगीत सभा होणार आहे. बुधवारी सकाळी धुळपेटीने उत्सवाची सांगता होणार आहे.

पोलिसांनी वाहतूक व्यवस्था चोख ठेवण्यासाठी सर्व व्यवस्था केली आहे. वाहने पार्क करण्यासाठी व गुलालोत्सवासाठी पुरेशी जागा उपलब्ध करण्यात आली आहे.

पाकिटमार व इतर वाईट प्रवृत्तीच्या लोकांवर कडी नजर ठेवण्यासाठी खास पोलिस तैनात करण्यात आले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Live: मुख्यमंत्र्य‍ांनी सभापतींना डोळे मारणे बंद करावे!

Bangkok Shooting: कंबोडियासोबत युद्ध सुरु असतानाच थायलंडच्या बँकॉकमध्ये गोळीबार; 6 जणांचा मृत्यू, हल्लेखोराने स्वतःलाही संपवलं Watch Video

Asia Cup 2025: आशिया कपपूर्वी मोठी घोषणा! 13 हजार धावा करणारा दिग्गज बनला मुख्य प्रशिक्षक

Goa Education: ABC म्हणजे 'रोमन कोकणी' नव्हे, देवनागरी कोकणीतून शाळा सुरू करण्यास सरकार देणार मदत; मुख्यमंत्र्यांनी केले स्पष्ट

'किमान मुख्यमंत्री, आमदाराला फोन करुन चौकशी करा, कोणालाही पैसे पाठवू नका'; मुख्यमंत्र्यांचे गोमंतकीयांना आवाहन

SCROLL FOR NEXT