State Youth Festival Dainik Gomantak
गोवा

State Youth Festival : गोव्यात लवकरच ‘युवा मंडळ’ : सांस्कृतिक मंत्री गोविंद गावडे

युवा महोत्सव म्हणजे युवकांची मानसिकता समजून त्यांना सक्षम करणे. गोमंतकीय तरुण गोव्यातच कसा राहणार याकडे जास्त लक्ष पुरविणे गरजेचे आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

State Youth Festival : सासष्टी, : गोव्यातील युवकांचे प्रश्र्न हाताळण्यासाठी व त्यांना विविध क्षेत्रांमध्ये स्थान मिळवून देण्यासाठी तसेच त्यांचे कौशल्य, त्यांची क्षमता जाणून घेऊन त्यांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी येत्या काही महिन्यांत गोव्यात गोवा युवा मंडळाची स्थापना केली जाईल,

अशी घोषणा क्रीडा, कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी मडगावात केली. गोव्याच्या क्रीडा व युवा व्यवहार खात्याने आयोजित केलेल्या तीन दिवसीय विसाव्या राज्य युवा महोत्सवाच्या समारोप सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे या नात्याने उपस्थित होते.

युवा महोत्सवाचे आयोजन करणे महत्त्वाचे असते. त्यात सहभागी होण्याने आपल्या प्रतिभाशक्तीला चालना मिळते. त्यातून वेगवेगळे विचार तयार होतात, असेही मंत्री गावडे यांनी सांगितले.

समारोप सोहळ्यात नेहरू युवक केंद्राचे उपसंचालक कालिदास घाटवळ, रवींद्र भवन मडगावचे अध्यक्ष राजेंद्र तालक,

क्रीडा संचालक अरविंद खुटकर, उपसंचालक जेनिफर गोन्साल्विस ई फेर्रांव, राष्ट्रीय युवा पुरस्काराने सन्मानित सर्वानंद सावंत देसाई, गुणाजी मांद्रेकर हे मान्यवर उपस्थित होते.

विविध स्पर्धांचे विजेते

लोकगीत (गट) : कला साम्राज्य (कुडचडे), रोझरी उच्च माध्यमिक (नावेली), नवदुर्गा कला व संस्कृती मंडळ (मडकई).

लोकगीत (एकेरी) : रोहित देसाई (मल्लिकार्जुन महाविद्यालय), झिया रॉड्रिग्स (गोवा कॉलेज ऑफ होम सायन्स), सिया गावडे (सरकारी कॉलेज, खांडोळा).

कथा स्पर्धा : तृप्ती चव्हाण (अवर लेडी ऑफ रोझरी उच्च माध्यमिक, दोना पावला), सेजल क्रिस्तोफर (सरकारी कॉलेज, खांडोळा), अभिग्यान रॉय (सरकारी कॉलेज, बोर्डा).

लोकनृत्य (समूह) : इंद्रेश्वर युथ क्लब (काणकोण), सरकारी कॉलेज (खांडोळा), नवदुर्गा कला व संस्कृती मंडळ (मडकई).

लोकनृत्य (एकेरी) : देऊ गावडे (नवदुर्गा, मडकई), आस्था हरमलकर (सेंट झेवियर्स महाविद्यालय, म्हापसा), सेजल गावडे (फा. आग्नेल, पिलार)

याव्यतिरिक्त फोटोग्राफी, पोस्टर रंगविणे, घोषणा तयार करणे सारख्या स्पर्धाही आयोजित करण्यात आल्या होत्या.

आवश्‍यक गोष्टी शिकाव्यात

युवा महोत्सव म्हणजे युवकांची मानसिकता समजून त्यांना सक्षम करणे. गोमंतकीय तरुण गोव्यातच कसा राहणार याकडे जास्त लक्ष पुरविणे गरजेचे आहे.

युवा महोत्सवाद्वारे युवकांनी आपल्या भवितव्याशी संबंधित अनेक गोष्टी शिकल्या व आत्मसात केल्या पाहिजेत, असे कामत यांनी सांगितले.

५४८ युवक सहभागी

गोव्याच्या क्रीडा व युवा व्यवहार खात्याने आयोजित केलेल्या २०व्या राज्य युवा महोत्सवातही स्पर्धांबरोबरच युवकांसाठी विविध क्षेत्रांमधील कौशल्य विकास, रोजगार, व्यवसाय, उद्योजकता यावर भर देण्यात आला. यंदाच्या महोत्सवात ५४८ युवक सहभागी झाले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

WI vs PAK: 18 धावांत 6 विकेट्स...! पाकिस्तानच्या फलंदाजांचा वेस्ट इंडिजच्या 'या' पठ्ठ्यानं उडवला फज्जा; डेल स्टेनचा मोडला 13 वर्ष जुना रेकॉर्ड

Rahul Gandhi: 'मृत' मतदारांसोबत राहुल गांधींची 'चाय पे चर्चा'! निवडणूक आयोगावर पुन्हा साधला निशाणा; VIDEO

Aahana Kumra: 'पोलिस अधिकाऱ्यांशी हुज्जत घातली, गोव्यात मला अटक झाली असती'; प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला अनुभव

Pune Crime: रंगकाम करताना घरमालकाला लावला चुना; पुण्यात 4 लाखांची चोरी करणाऱ्या प्रमोदला गोव्यात अटक

Horoscope: गुरुवारी 'गजलक्ष्मी योग'चा शुभ संयोग! 'या' 5 राशींच्या लोकांसाठी उद्याचा दिवस खूप खास, होणार मोठा धनलाभ; भगवान विष्णूचीही राहणार कृपा

SCROLL FOR NEXT