Yuri Alemao
Yuri Alemao Dainik Gomantak
गोवा

''...गोव्याच्या जनतेचा बिलकुल विश्वास नाही''; युरी आलेमाव यांचा मुख्यमंत्र्यांवर घणाघात

Manish Jadhav

Yuri Alemao criticized Chief Minister Pramod Sawant: दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात खाजगी वैद्यकीय महाविद्यालय चालवण्यासाठी ट्रस्ट बनवण्याच्या मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या प्रस्तावावर गोमतकीयांचा ट्रस्ट अर्थात विश्वास नाही. या ट्रस्टमध्ये अदानी, अंबानी,जिएमआर आणि इतर क्रोनी कॅपिटलिस्ट विश्वस्त म्हणून असू शकतात. भाजप सरकारने आयसीयू, कॅथलॅब, न्यूरो सर्जरी युनिटवर लक्ष केंद्रित केले पाहिजे आणि डॉक्टर, परिचारिका, तंत्रज्ञांसह सर्व मंजूर कर्मचारी दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात त्वरित नियुक्त करावेत. आम्ही खाजगीकरणाला विरोध करतो, असे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी म्हटले आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी खासगी वैद्यकीय महाविद्यालय दक्षिण गोव्यातील हॉस्पिसिओ रुग्णालयामध्ये सुरु करण्याच्या नुकत्याच केलेल्या घोषणेवर प्रतिक्रिया व्यक्त देताना, युरी आलेमाव यांनी सर्व काही क्रोनी कॅपिटलिस्टच्या हाती सोपवण्याचे धोरण अवलंबवल्याबद्दल भाजप सरकारवर टीका केली. दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालय हा गोमंतकीयांना स्वस्त आरोग्य सेवा देण्यासाठी काँग्रेस सरकारचा दूरदर्शी प्रकल्प होता. रुग्णालयाच्या खाजगीकरणाच्या कोणत्याही प्रस्तावाविरुद्ध आम्ही एकत्रितपणे लढा देऊ आणि विरोध करु, असा इशारा युरी आलेमाव यांनी दिला आहे.

दुसरीकडे, दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात डॉक्टरांची 28 रिक्त पदे भरायची आहेत. या रिक्त पदांमध्ये 1 वरिष्ठ बालरोगतज्ञ, 2 वरिष्ठ शल्यचिकित्सक, 1 वरिष्ठ ईएनटी सर्जन, एक वरिष्ठ नेत्र शल्यचिकित्सक, एक वरिष्ठ मानसोपचार तज्ज्ञ, 2 वरिष्ठ ऑर्थोपेडिक सर्जन, 2 मेडिको कायदेशीर अधिकारी, 3 कनिष्ठ भूलतज्ज्ञ आणि 3 वैद्यकीय अधिकारी आणि इतर वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पदांचा समावेश आहे, असेही आलेमाव यांनी नमूद केले.

सरकारने अजून आवश्यक असलेली कार्डियाक कॅथ लॅब सुरु केलेली नाही. गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचा कार्डिओलॉजिस्ट आठवड्यातून एकदाच मडगावला येवून कार्डिओलॉजी ओपीडी सेवा सुरु देत आहे, असे युरी आलेमाव यांनी सांगितले. न्यूरो सर्जरी युनिट कधी सुरु होईल, हे कोणालाच माहीत नाही. सरकार वर्षानुवर्षे केवळ आश्वासने देत आहे. त्यांच्याकडे कार्यक्रमांवर खर्च करण्यासाठी पैसे आहेत, परंतु आरोग्य सेवेसाठी निधीची कमतरता आहे, असे युरी आलेमाव म्हणाले.

नेफ्रोलॉजी, न्यूरोलॉजी, कार्डिओलॉजी, आयसीयू (इंटेन्सिव्ह केअर युनिट), आयटीयू (इंटेन्सिव्ह ट्रॉमा युनिट), सीसीयू (क्रिटिकल केअर युनिट), प्लास्टिक सर्जरी आणि एमआरआय (मॅग्नेटिक रेझोनान्स इमेजिंग), ऑन्कोलॉजी यासारख्या सुपर स्पेशालिटी सेवा अजुनही दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात उपलब्ध नाहीत, असेही आलेमाव म्हणाले.

माझ्याकडे असलेल्या माहिती प्रमाणे 642 मंजूर पदांपैकी 494 पदे भरलेली आहेत त्यापैकी 159 कंत्राटी आधारावर आहेत आणि 155 अजूनही रिक्त आहेत, असे युरी आलेमाव म्हणाले. दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालय हे रेफरल हॉस्पिटल बनले आहे. जवळजवळ प्रत्येक रुग्णाला जीएमसी किंवा खाजगी हॉस्पिटलात पाठवले जाते, असा आरोप युरी आलेमाव यांनी केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

कोणत्याही क्षणी येणार आदेश, Goa DGP जसपाल सिंग तातडीने दिल्लीला रवाना

Goa Top News: कोलवा महिला मारहाण प्रकरण, कुठ्ठाळीत खून, मडगावात भाजपला गळती; गोव्यातील ठळक बातम्या

Goa: ड्रमर मित्राने दोन दिवस फोन उचलला नाही; दरवाजा उघडल्यावर जे दृष्य दिसलं ते पाहून सर्वांचे डोळे पाणावले

Goa DGP जसपाल यांची 'दादागिरी' सुरुच, जाता - जाता पोलिस अधिकाऱ्यांवर सूडबुद्धीने कारवाया

Bicholim Road Potholes: भयानक अपघात घडण्यापूर्वी उपाययोजना करा; वाहनचालकांची मागणी

SCROLL FOR NEXT