Yuri Alemao Slams Goa Government
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारच्या कारभाराची दयनीय अवस्था पुन्हा एकदा समोर आली असून, प्रशासकीय अपयशावर आणखी एका पदासीन राज्यपालांनी चिंता व्यक्त करणे हे धक्कादायक आहे.
माजी राज्यपाल सत्यपाल मलिक हे भ्रष्टाचारावर उघडपणे बोलल्यानंतर आता राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी गोव्याच्या "हॅपीनेस इंडेक्स"संबंधी शंका उपस्थित केली आहे. यावरुन भाजप सरकारचा गलथान कारभार परत एकदा समोर आला आहे, असे विधान विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी म्हटले आहे.
गोव्याचे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी गोव्याच्या हॅपीनेस इंडेक्स निर्देशांकावर भाष्य करण्याचे टाळले यावर प्रतिक्रिया देताना, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी राज्यातील अर्थव्यवस्था आणि प्रशासनाला पुनरुज्जीवित करण्यात मदत करणाऱ्या महत्त्वाच्या अभ्यास अहवालांकडे दुर्लक्ष केल्याबद्दल भाजप सरकारला दोष देत जबाबदार धरले आहे.
भारताच्या नियोजन आयोगाच्या मदतीने तयार करण्यात आलेल्या मनुष्यबळ विकास अहवालाचा मसुदा तयार करण्यासाठी काँग्रेस सरकारने 2010 मध्ये तत्कालीन मुख्य सचिव संजय श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली होती.
दुर्दैवाने, 2012 नंतर सत्तेवर आलेल्या भाजप सरकारांनी अहवालाची अंमलबजावणी करण्याऐवजी तो शितपेटीत टाकला, असा आरोप युरी आलेमाव यांनी केला.
कॉंग्रेस सरकारने नेमलेल्या प्रख्यात शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या नेतृत्वाखालील समितीच्या तज्ज्ञांनी तयार केलेल्या गोवा व्हिजन 2035 डॉक्युमेंटच्या शिफारशींची अंमलबजावणी करणे आणि काँग्रेस सरकारनेच तयार केलेल्या मनुष्यबळ विकास अहवालाच्या अंमलबजावणीवरही काम केल्यास गोमंतकीयांच्या चेहऱ्यावर हास्य आणण्यास मदत होणार आहे, हे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ध्यानात ठेवून सदर अहवालांची अमंलबजावणी करावी अशी मागणी युरी आलेमाव यांनी केली आहे.
आपण काय मिळवले आणि पुढे काय मिळवू शकतो याचा आढावा घेण्याची हीच वेळ आहे. राज्याला कोणते प्रश्न भेडसावत आहेत आणि भविष्यात राज्याने कोणता मार्ग स्वीकारावा यावर सखोल अभ्यास होणे गरजेचे आहे.सरकारने जनतेच्या आकांक्षा आणि भावनांबाबत संवेदनशील असणे आवश्यक आहे, असे युरी आलेमाव म्हणाले.
सरकारने गोमंतकीय युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी आणि त्यांना राज्याबाहेर स्थलांतरित होण्यापासून रोखण्यासाठी गोवा हे ज्ञान केंद्र म्हणून विकसित केले पाहिजे.
भौतिक विकासापेक्षा संवेदनशील विकासावर लक्ष केंद्रित केल्यास राज्याची समृध्दी होईल व हॅपीनेस निर्देशांक उच्च ठेवण्यास मदत मिळेल असा दावा युरी आलेमाव यांनी केला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.