Yuri Alemao Slams Goa Government Dainik Gomantak
गोवा

Yuri Alemao: डॉ. राम मनोहर लोहियांची 114वी जयंती; लोहिया मैदानावरून युरींचा सरकारवर निशाणा

आज लोहियांची 114 वी जयंती आहे.

Kavya Powar

Yuri Alemao Slams Goa Government: गोव्याच्या मुक्तीसंग्रामात अनेक वीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. पोर्तुगीजांची राजवट संपवण्यासाठी गोवेकर एकत्र झाले होते, मात्र गोवा मुक्तीची खरी ठिणगी पेटली ती डॉ. राम मनोहर लोहिया यांच्या पुढाकाराने. त्यांनी गोवेकरांच्या मनात मुक्तीची मशाल पेटवली आणि लढ्याला खरी सुरुवात झाली.

आज लोहियांची 114 वी जयंती आहे. त्यांच्या स्मृती प्रीत्यर्थ मडगावातील मैदानाला गोवा स्वातंत्र्यानंतर लोहिया मैदान म्हणून घोषित करण्यात आले आणि त्याला गोव्यातील महत्वाच्या ठिकाणाचा दर्जा प्राप्त झाला.

काही कालावधीपासून या मैदानाचे नूतनीकरणाचे आणि सुशोभीकरणाचे काम सुरू आहे. यावरून विरोधी पक्षनेते युरी आलेमाओ यांनी गोवा सरकारवर निशाणा साधला आहे. लोहियांच्या जयंतीनिमित्त त्यांची आठवण काढताना ते म्हणाले की, लोहिया मैदान हे गोव्याचे एक महत्वाचे ठिकाण आहे. त्याचे काम त्वरित पूर्ण करावे आणि त्याला महत्वाचे ऐतिहासिक ठिकाण म्हणून अधिसूचित करावे.

लोहिया मैदानाचे काम पूर्ण करण्यासाठी 15 मार्चपर्यंतची मुदत आहे. मैदानाचे काम अंतिम टप्प्यात आलेले दिसते, पण GSUDA ची अंतिम मुदत 31 डिसेंबर 2022 या तारखेपर्यंत काम पूर्ण होऊ शकले नाही. त्यामुळे गोवा राज्य नागरी विकास एजन्सी (GSUDA) साठी लोहिया मैदानाचे सुरू असलेले सुशोभीकरणाचे काम पूर्ण करण्यासाठी आणि ते मडगाव नगरपरिषदेकडे सुपूर्द करण्यासाठी 15 मार्च ही नवीन मुदत देण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT