Yuri Alemao Dainik Gomantak
गोवा

Margao News : सरकारकडून तियात्र कलाकारांना सापत्न वागणूक -युरी आलेमाव

तियात्रिस्त सभागृहाच्या अनुपलब्धतेने तियात्र कलाकारांना होणाऱ्या गैरसोयीवर तसेच त्यांना सोसाव्या लागणाऱ्या नुकसानीची भरपाई देऊन दिलासा द्यावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Margao News : मडगाव रवींद्र भवन, मडगावला सर्वाधिक महसूल देणाऱ्या तियात्र कलाकारांवर अन्याय करण्याचा भाजप सरकारला अधिकार नाही.

कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी तात्काळ हस्तक्षेप करून नोव्हेंबरमध्ये पाय तियात्रिस्त सभागृहाच्या अनुपलब्धतेने तियात्र कलाकारांना होणाऱ्या गैरसोयीवर तसेच त्यांना

सोसाव्या लागणाऱ्या नुकसानीची भरपाई देऊन दिलासा द्यावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केली आहे.

रवींद्र भवन, मडगावने आगामी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे कारण देत नोव्हेंबरमध्ये तियात्र सादरीकरणासाठी पाय तियात्रिस्त सभागृह न देण्याच्या घेतलेल्या निर्णयावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करताना,

युरी आलेमाव यांनी गोव्यातील तियात्र कलाकारांना भाजप सरकार सापत्न वागणूक देत असल्याचा गंभीर आरोप केला.

कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी रवींद्र भवनच्या अधिकाऱ्यांना एकतर सभागृहाच्या दुरुस्ती कामाचे वेळापत्रक बदलण्याचे निर्देश द्यावेत किंवा सभागृह उपलब्ध नसल्यामुळे तियात्र कलाकारांचे नुकसान भरून काढण्यासाठी आर्थिक सहाय्य देऊन तियात्रिस्ताना भरपाई द्यावी, अशी मागणी युरी आलेमाव यांनी केली आहे

‘इफ्फी’चे कारण देत नोव्हेंबरमध्ये दुरुस्तीचे काम हाती घेण्याच्या निर्णयाने रवींद्र भवनचे प्रशासन पूर्ण कोलमडल्याचे दिसत आहे. दुरुस्तीचे काम करण्यासाठी रवींद्र भवनचे प्रशासन इतके महिने झोपले होते का? असा सवाल युरी आलेमाव यांनी केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Recruitment: तरुणांसाठी खुशखबर! निवड आयोगामार्फत 285 रिक्त जागांसाठी जाहिरात; 'या' पदांसाठी मागवले अर्ज

Vedanta Mining Dispute: पिळगावात दुसऱ्या दिवशीही खनिज वाहतूक बंद; शेतकरी मागणीवर ठाम

IFFI 2024: 'भूमी'चे गोमंतकीयांबद्दल गौरवोद्गार! म्हणाली की, लैंगिक भेदाकडे पाहण्याची दृष्टी...

Goa Crime: पुत्रविरहामुळे व्यथित होऊन 'त्याने' संपवले जीवन! सुसाईड नोटमध्ये केला पत्नी आणि तिच्या प्रियकरावर आरोप; Video मध्ये म्हणाला की...

Goa BJP: भाजप नेत्‍यांना पक्षशिस्‍त पाळण्याच्या सूचना! Cash For Job वर जाहीर वाच्‍यता नको; गाभा समितीच्या बैठकीत घमासान

SCROLL FOR NEXT