Calangute Dainik Gomantak
गोवा

Calangute Beach: कळंगुटमध्ये डान्सबारच्या विरोधात युवक एकवटले

गावातील अवैध धंदे बंद करण्यासाठी मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन

गोमन्तक डिजिटल टीम

कळंगुटच्या समुद्रकिनारी गावात सुरू असलेल्या बेकायदा डान्सबार आणि इतर बेकायदेशीर गोष्टींच्या निषेधार्थ कळंगुट तरुणांच्या एका गटाने रविवारी (८ जानेवारी) शांततापूर्ण मोर्चा काढलाय. कळंगुट, आजूबाजूची गावे आणि गोव्यातील इतर भागातील लोकांना जांबलेश्वर मंदिरापासून दुपारी ४ वाजता निघणाऱ्या आणि बागा समुद्रकिनारी संपणाऱ्या या शांततापूर्ण मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन या तरुणांनी केले आहे.

यालढ्याविषयी बोलताना कुंदन केरकर म्हणाले, "हा लढा भावी पिढ्यांसाठी आहे. गावात सुरू असलेल्या सर्व बेकायदेशीर गोष्टींना संपवण्यासाठीची ही लढाई आहे. कळंगुटमध्ये सुरू असलेल्या बेकायदेशीर डान्सबार आणि इतर बेकायदेशीर गोष्टींचा आम्ही निषेध करत आहोत. आम्ही लोकांना त्यांच्या कुटुंबांसह शांततापूर्ण मोर्चात सामील होण्याची विनंती करतो."

"डान्सबार हे कॅन्सरसारखे आहेत आणि ते झपाट्याने पसरत आहेत. हा कॅन्सर फक्त कळंगुट गावापुरता मर्यादित नाही तर गोव्याच्या इतर भागातही पसरत आहे. जर आपण वेळीच योग्य पावले उचलली नाहीत तर भविष्यात त्याचे परिणाम भयानक असू शकतात असे या आंदोलकांचे म्हणणे आहे.

कळंगुट पंचायतीने बेकायदेशीर डान्सबारच्या विरोधात ठोस भूमिका घेतली होती आणि गावातील अवैध धंदे बंद करण्यासाठी काही पावले उचलली होती. कळंगुट मतदारसंघ मंचाचे अध्यक्ष प्रेमानंद दिवकर यांनीही गावकऱ्यांनी या मोर्चात सहभागी होऊन समुद्रकिनारी असलेले गाव वाचवावे, असे आवाहन केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

अमेरिकेत 'इंडिया डे'चा धमाका! 80व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त न्यू यॉर्कची 'अँपायर स्टेट बिल्डींग' झाली तिरंगामयी; तारक मेहताच्या कलाकारांची खास उपस्थिती

Goa Crocodile Video: गोव्यात घरात घुसली भलीमोठी मगर; कुटुंबाची उडाली तारांबळ, वन विभागाकडून मगरीची सुरक्षित सुटका

PM Modi Mental Naxalism Statement: मोदींच्या ‘बौद्धिक नक्षली’ उल्लेखावरून रणकंदन; विरोधकांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

Upasnagar Sankval Junction: भुयारी मार्ग नाही तर रस्त्यावर उतरू! उपासनगर-सांकवाळ ग्रामस्थांचा इशारा; चौक ठरतोय ‘मृत्यूचा सापळा’

VIDEO: "चिदंबरम यांच्या काळात 5000 निष्पाप मारले गेले!"; 'दिमागी नक्षल' मुद्द्यावरुन भाजपचा काँग्रेसवर कडाडून हल्लाबोल, सुधांशु त्रिवेदींनी घेतलं फैलावर

SCROLL FOR NEXT