Accident Canva
गोवा

Nerul Accident: दुर्दैवी! कुत्रा आडवा आल्यामुळे युवकाने गमावला जीव; नेरूल येथील घटना

Goa Accident: नेरूल येथे रस्त्यामध्ये आलेल्या कुत्र्याला धडक बसल्यानंतर दुचाकीवर मागे बसलेला युवक टँकरच्या चाकाखाली सापडल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

गोमन्तक डिजिटल टीम

Nerul Accident

म्हापसा: नेरूल येथे रस्त्यामध्ये आलेल्या कुत्र्याला धडक बसल्यानंतर दुचाकीवर मागे बसलेला युवक टँकरच्या चाकाखाली सापडल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. वनलाल दुहपुईआ (२६, रा. मूळ मिझोराम) असे मृत युवकाचे नाव आहे, तर दुचाकीचालक जेम्स वनलालिन (२६, रा. मूळ मिझोराम) हा किरकोळ जखमी झाला.

हा अपघात गुरुवारी सकाळी ६.४५ वा.च्या सुमारास घडला. हे दोन्ही युवक जीए-०३-एएल-८०९४ क्रमांकाच्या दुचाकीवरून कांदोळी ते पर्वरीच्या दिशेने येत होते. नेरूल पंचायतीजवळ त्यांच्या दुचाकीसमोर अचानक कुत्रा आला. या कुत्र्याला दुचाकीची धडक बसल्यानंतर जेम्स याचे दुचाकीवरील नियंत्रण गेले व वनलाल हा रस्त्याच्या विरुद्ध दिशेने पडला.

त्यावेळी तिथून जाणाऱ्या जीए-०२-व्ही-९०९९ क्रमांकाचा टँकरच्या मागच्या चाकाखाली वनलाल हा सापडला व तिथेच त्याचा मृत्यू झाला, तर दुचाकीचालक जेम्स हा किरकोळ जखमी झाला. या अपघाताची माहिती मिळताच पर्वरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमीला रुग्णवाहिकेतून इस्पितळात दाखल केले. अपघाताचा पंचनामा पोलिस उपनिरीक्षक प्रजीत तुळसकर व हवालदार सुभाष गावस यांनी केला. पुढील पोलिस तपास सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT