Goa Accident News Dainik Gomantak
गोवा

पेडणेत युवक ठार; मालिका थांबेना!

आजही राज्यात काही ठिकाणी अपघात झाले. धारगळ येथील अपघातात एका 19 वर्षीय दुचाकीस्वाराला भरधाव ट्रकने चिरडले

दैनिक गोमन्तक

मोरजी: राज्यात गेल्या काही दिवसांपासूून सुरू असलेली भीषण अपघातांची मालिका थांबायचे नावच घेत नाही. आजही राज्यात काही ठिकाणी अपघात झाले. धारगळ येथील अपघातात एका 19 वर्षीय दुचाकीस्वाराला भरधाव ट्रकने चिरडले, तर फातोर्डा येथे बसमधील 5 मुले जखमी झाली.

(Youth killed in an accident in pernem)

कासिमभाट-वझरी येथील चेतन सुभाष परब (19) या युवकाला दाडाचीवाडी-धारगळ येथे ट्रकने चिरडले. यात त्याच्या दुचाकीचाही चक्काचूर झाला. शिवाय त्याच्या शरीराचे अवयव विखुरले होते. त्यामुळे घटनास्थळी मन सुन्न करणारे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी संतप्त नागरिकांनी ट्रक रोखून धरला आणि थोड्या प्रमाणात त्याची मोडतोडही केली. मात्र, पोलिस वेळीच घटनास्थळी पोचल्याने वातावरण निवळले. ही घटना 30 रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास घडल्याची माहिती पेडणे पोलिस निरीक्षक दत्ताराम राऊत यांनी दिली.

सविस्तर माहिती अशी, की चेतन परब हा धारगळ-सुकेकुळण मार्गे वझरी पेडणे याठिकाणी जात असता, समोरून येणाऱ्या अवजड ट्रकने (क्र. एमएच 46- बीयु 0697) त्याला धडक दिली. यावेळी त्याची दुचाकी ट्रकच्या चाकाखालीच राहिली आणि किमान दहा मीटर त्याला फरपटत नेले. त्यात चेतनचा जागीच मृत्यू झाला. शिवाय त्याच्या दुचाकीचाही चक्काचूर झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT