Goa Drowning Case Dainik Gomantak
गोवा

Galgibagh Beach: जीवन संपविण्यासाठी त्याने नदीत उडी घेतली, जीवरक्षकांनी वाचवले प्राण

Galgibagh Beach: जीवरक्षक घटनास्थळी दाखल होत त्यांनी नदीत उडी मारलेल्या तरुणाला सुखरुप बाहेर काढले.

Pramod Yadav

मडगाव: दक्षिण गोव्यातील गालजीबाग येथे सोमवारी (३० सप्टेंबर) २५ वर्षीय तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केला. जीवन संपविण्याच्या उद्देशाने तरुणाने खोल नदीत उडी घेतली पण त्याचवेळी तेथे उपस्थित असलेल्या दृष्टीच्या जीवरक्षकांनी त्याला जीवदान दिले.

गालजीबाग नदीत एकाने उडी मारुन जीव देण्याचा प्रयत्न केल्याची माहिती स्थानिक आणि घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी दृष्टीच्या जीवरक्षकांना दिली. जीवरक्षक घटनास्थळी दाखल होत त्यांनी नदीत उडी मारलेल्या तरुणाला सुखरुप बाहेर काढले.

दृष्टीच्या जीवरक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्ही घटनास्थळी दाखल झालो त्यावेळी तरुणाने पूर्वीच नदीत उडी घेतली होती. दरम्यान, जीवरक्षकांनी तात्काळ नदीत उतरुन तरुणाला सुखरुप बाहेर काढले.

मांद्रे समुद्रकिनाऱ्यावर दोघांना जीवदान

दुसऱ्या एका घटनेत मांद्रे समुद्रकिनाऱ्यावर दोन मध्यम वयातील नागरिकांना बुडण्यापासून वाचवण्यात आले. ४० आणि ४२ वर्षीय दोन व्यक्ती ५०० मीटर खोल खाडीत समुद्रात बुडत असताना त्यांना दृष्टीच्या जीवरक्षकांनी जीवदान दिले.

दोन नागरिक बुडत असल्याचे पाहून जीवरक्षक सुरज केळुसकर यांनी समुद्रात जात ट्यूबच्या मदतीने त्यांना सुखरुप बाहेर काढले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT