Goa Crime News Dainik Gomantak
गोवा

Goa Crime News: कर्नाटकातील तरुणाने भाड्याच्या खोलीत संपवले जीवन; पैंगीणमधील घटना

याबाबत काणकोणचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत गावस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

Kavya Powar

Goa Crime News: पैंगीण येथे काल (मंगळवारी) कर्नाटकातील एका तरुणाने भाड्याच्या खोलीत आपले जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याबाबत काणकोणचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत गावस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

निरीक्षक गावस यांनी दिलेल्या माहितीनुसार, समीर सावंत (29, मूळचा खानापूर-कर्नाटक) असे जीवन संपवलेल्या तरुणाचे नाव आहे. समीर पाच दिवसांपूर्वी इथे आला होता आणि तो एका बांधकामाच्या ठिकाणी गवंडी म्हणून काम करत होता. तो पैंगीण येथे आपल्या लहान भावासोबत भाड्याच्या या खोलीत राहत होता.

याबाबत अधिक माहिती अशी की, समीरचा लहान भाऊ काल संध्याकाळी 6 वाजताच्या सुमारास त्यांच्या खोलीत परतला तेव्हा समीर मृतावस्थेत असल्याचे त्याला आढळून आले. याबाबत त्वरित पोलिसांना कळवण्यात आले.

त्यानंतर समीरला काणकोण आरोग्य केंद्रात हलवण्यात आले; मात्र तिथे नेल्यानंतर त्याला मृत घोषित करण्यात आले. समीरने आत्महत्या का केली याचे नेमके कारण कळू शकले नाही. मात्र यामागे त्याचे काहीतरी वैयक्तिक कारण असल्याचे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mitchell Starc Fight: लाईव्ह सामन्यात 'रनिंग लाईन'वरुन राडा! मिचेल स्टार्क मेहदी हसन मिराजशी भिडला; हाय-व्होल्टेज ड्रामा व्हायरल

Goa Olympic Association: 'गोवा ऑलिंपिक'ला 21 वर्षांनंतर लाभणार नवा सचिव, गुरुदत्त भक्ता यांची दोन दशकांची कारकीर्द; महत्त्वाच्या स्पर्धांचे राज्यात आयोजन

Shukra Pushkaransh Yog 2026: शुक्रदेवांची अफाट कृपादृष्टी! 15 ऑगस्टपासून 'या' राशींच्या नशिबाला मिळणार नवी दिशा; 'शुक्र पुष्करांश' योग करणार मालामाल

Calangute Dance Bar: कळंगुटमधील 'डान्स बार' बंद करा, गट काँग्रेस समितीची मागणी; पोलिसांना निवेदन सादर

Child Disappearance Goa: राज्यात पाच वर्षांत हरवली 256 मुले, 106 सापडली,150 बेपत्ता

SCROLL FOR NEXT