Mangaluru Crime News Dainik Gomantak
गोवा

Mangaluru: मंगळुरुमध्ये पिस्तुलासह तरुणाला अटक, गोव्यातील खुनाच्या आरोपींशी आहेत जवळचे संबंध

शिशिर आणि अँड्र्यू रॉड्रिग्स तुरुंगात भेटले होते आणि तेव्हापासून त्यांच्यात घनिष्ठ संबंध निर्माण झाल्याची माहिती आहे.

Pramod Yadav

Mangaluru Crime News: मंगळुरु शहर पोलिसांनी मंगळवारी (04 एप्रिल) एका तरुणाला पिस्तुलासह अटक केली आहे. या तरूण राहत असलेल्या भाड्याच्या घरातून अनधिकृत पिस्तूल आणि गोळी ठेवल्याच्या आरोपाखाली अटक केलीय.

संशयित तरूणाला त्याच्या मित्राने शस्त्र दिले होते. अशी माहिती समोर आली आहे.

शिशिर असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. संशयित आरोपीचे गोव्यातील अँड्र्यू रॉड्रिग्ज याच्याशी जवळचे संबंध असल्याची माहिती समोर आली. अँड्र्यू रॉड्रिग्ज 2014 मध्ये हंपनकट्टा येथे झालेल्या खून प्रकरणातील आरोपी होता. रॉड्रिग्सला नंतर गोव्यात अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याला कोर्टातून त्याला जामीन मिळाला होता. दरम्यान, अनेकवेळा न्यायालयात गैरहजर राहिल्याने त्याला फरार घोषित करण्यात आले.

तसेत, मंगळुरु येथे अटक करण्यात आलेल्या शिशिर याच्याविरोधात मंगळुरू बंदर, कावूरू आणि पांडेश्वरा पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.

संशयित आरोपी शिशिर मूळचा उडुपीचा रहिवाशी आहे आणि त्याच्या विरोधातील गुन्हेगारी कारवायांमुळे तो घरापासून दूर राहतो. तेव्हापासून तो मंगळुरूमध्ये एकटाच राहत होता. अशी माहिती समोर आलीय.

शिशिर आणि अँड्र्यू रॉड्रिग्स तुरुंगात भेटले होते आणि तेव्हापासून त्यांच्यात घनिष्ठ संबंध निर्माण झाल्याची माहिती आहे. दरम्यान, आरोपी रॉड्रिग्जला अटक करण्यासाठी पोलीस प्रयत्नशील आहेत.

घरमालकाने पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर शिशिरला अटक करण्यात आली आणि चौकशीदरम्यान त्या व्यक्तीला पिस्तूल अँड्र्यू रॉड्रिग्सने दिल्याचे उघड झाले. शिशिर हा गेल्या पाच महिन्यांपासून या घरात राहत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT