mla krushna salkar and vijai sardesai Dainik Gomantak
गोवा

तुम्ही सेक्युलर नाहीच! भाजप आमदाराने 'हिंदूंचाच नव्हे, आमचा पक्ष सेक्युलर', म्हणताच विजय सरदेसाईंनी डिवचलं

BJP secularism controversy: वारकऱ्यांना आर्थिक मदत मिळण्यासाठी मांडलेल्या खासगी ठरावावर चर्चा सुरु असताना सरदेसाई आणि साळकर यांच्यात देवाणघेवाण झाली.

Pramod Yadav

पर्वरी: आमचा (भाजप) हिंदूंचाच नव्हे तर सगळ्यात सेक्युलर पक्ष असल्याचे वक्तव्य वास्कोचे भाजपचे आमदार कृष्णा साळकर यांनी करताच विजय सरदेसाईंनी त्यांना टोकले. तुमचा पक्ष (भाजप) सेक्युलर नाहीच, असे सरदेसाई म्हणाले. गोव्यातून पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी आर्थिक मदत देण्यात यावी या खासगी ठरावावर सभागृहात बोलत असताना साळकर आणि सरदेसाई या दोघांमध्ये शाब्दिक देवाणघेवाण झाली.

दरवर्षी पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी आर्थिक मदत देण्यात यावी, असा खासगी ठराव प्रेमेंद्र शेट यांनी पावसाळी अधिवेशनात मांडला. या ठरावाला समर्थन देताना विजय सरदेसाईंनी मुख्यमंत्र्यांनी गेल्या वर्षी सभागृहात दिलेल्या आश्वासनाची आठवण करुन देत, भाजपच्या हिंदुत्वावरही भाष्य केले.

जुलै २०२४ मध्ये मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले होते त्याचे काय झाले? असा सवाल सरदेसाईंनी उपस्थित केला. तसेच, गर्व से कहो हिंदू है म्हणणारा हिंदुत्ववादी पक्ष झोपला होता, असेही सरदेसाई म्हणाले.

यानंतर ठरावाला पाठिंबा देण्यासाठी उभे राहिलेल्या आमदार कृष्णा साळकर यांनी, 'सरदेसाई भाजप हिंदुत्ववादी पक्ष म्हणतात पण तसे नाही हिंदूचाच नव्हे तर आमचा सेक्युलर पक्ष,' असल्याचे वक्तव्य साळकरांनी केले. यावर सरदेसाईंनी त्यांना टोकले आणि 'तुमचा सेक्युलर पक्ष नाहीच,' असे ठासून सांगितले. तुमच्या पेक्षा विश्वजीत राणे चांगल्या पद्धतीने आरएसएस शिकले असा टोमणाही सरदेसाईंनी लगावला.

दरम्यान, प्रेमेंद्र शेट यांनी वारकऱ्यांना आर्थिक मदत मिळण्यासाठी मांडलेला खासगी ठराव सभागृहात एकमताने मान्य झाला. मुख्यमंत्र्यांनी यासाठी अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद करण्यास सकारात्कमता दर्शवता योजनाही तयार करण्याची तयारी दर्शवली. तसेच, वारकरी भवनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्रही लिहल्याची माहिती त्यांनी सभागृहात दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vidya Balan: 'तुझं नाक खूप मोठं आहे, सर्जरी कर...'; बॉलिवूड दिग्दर्शकाने विद्या बालनला का दिला होता सल्ला? स्वत:च केला मोठा खुलासा

Senior Citizens: देशातील 70 टक्के ज्येष्ठांचा खिसा रिकामा, उदरनिर्वाहासाठी अनेकजण निवृत्तीनंतरही कामावर

IND vs ENG: 'त्याला डिवचणं आमच्या प्लानचा भाग होता...'; जो रुटसोबतच्या वादावर प्रसिद्ध कृष्णाने सोडले मौन!

Goa News Live Update: दुर्गेश नाईक तुरुंग यांचा भव्य निरोप समारंभ

Quepem lottery: केपेची लॉटरी ठरली 'हिट'! गणेशोत्सव मंडळाच्या कूपनसाठी मध्यरात्रीपासून गर्दी; 2 कि.मीची रांग

SCROLL FOR NEXT