पेडणेतील युवतीवर ट्रक चालकांनी केला अत्याचार Dainik Gomantak
गोवा

फेसबूक मैत्रीचा फायदा घेत पेडणेतील युवतीवर बलात्कार

उस्मानने तिला आपल्या ट्रकमध्ये घेतले व मडगावला खडी खाली करून पुन्हा उसगावला आणले.

दैनिक गोमन्तक

फोंडा: फेसबूकवरील (Facebook) मैत्रीचा (Friends) फायदा उठवत पेडणे (Pernem) येथील एका युवतीला उसगावात बोलाविले आणि त्यानंतर तिच्यावर दोघांनी बलात्कार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. सध्या बलात्कार प्रकरणांमुळे राज्यात (Goa) सुरक्षा व कायद्याचा विषय ऐरणीवर आला आहे. विधानसभेतही (Goa Assembly) हा विषय गाजत आहे. (Young woman from Pernem was raped by two truck drivers)

या बलात्कार प्रकरणातील एक संशयित साईजू वर्गीस हा मूळ केरळचा असून होंड्यात राहतो, असे पोलिसांनी सांगितले. 19 वर्षीय युवतीशी उस्मान सय्यद याने फेसबूकवरून मैत्री केली. फेसबूकवरील फ्रेंड रिक्वेस्ट पीडित युवतीने स्वीकारल्यानंतर दोघांतही चॅटिंग सुरू झाले. त्यानंतर उस्मानने आपला मोबाईल क्रमांक त्या युवतीला दिल्यानंतर त्यांच्यात थेट बोलणी व्हायला लागली. या बोलण्यातूनच उस्मानने त्या युवतीला भेटायला बोलावले. पीडित युवतीची एक मैत्रीण उसगावात राहत असल्याने तिला उसगाव परिचित होते, त्यामुळे भेटीचे ठिकाण उसगाव निश्‍चित करण्यात आले.

ठरल्यानुसार ती युवती जूनच्या पहिल्या आठवड्यात उसगावला आल्यानंतर उस्मानने तिला आपल्या ट्रकमध्ये घेतले व मडगावला खडी खाली करून पुन्हा उसगावला आणले. तेथून होंडा व नंतर डिचोली अशी भटकंती त्यांनी ट्रकमधूनच केली. उस्मानचा घनिष्ठ मित्र असलेला दुसरा ट्रकचालक साईजू वर्गीस याला उस्मानने फोन करून बोलावून घेतले व त्यालाही गाडीत घेतले. या दोघांनीही ट्रक होंड्यात ठेवून तेथून कारगाडीत या युवतीला घेऊन पुन्हा उसगाव गाठले व तेथे निर्जनस्थळी गाडी ठेवून दोघांनीही आळीपाळीने युवतीवर बलात्कार केला.

दीड महिन्यानंतर या मुलीच्या पोटात दुखत असल्याची तक्रार तिने आपल्या आईकडे केली. आईने मंगळवारी तिला पेडणे सरकारी आरोग्य केंद्रात तपासणीसाठी नेले. तपासणीवेळी डॉक्टरांना संशय आल्याने त्यांनी या मुलीला खोदून विचारले असता, पीडितेने सगळे काही सांगून टाकले. शेवटी हे प्रकरण बलात्काराचे असल्याने डॉक्टरांनी पेडणे पोलिसांशी संपर्क साधून त्यांना याबाबत माहिती दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: प्रथमेश गावडे प्रकरणी तनिष्का चव्हाण आणि प्रीती चव्हाण यांना सशर्त जामीन मंजूर!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Goa Vegetable: कांद्याने आणले डोळ्यात पाणी! नासाडीमुळे दर वाढले; अन्य भाज्यांचे दर स्थिर

Margao News: स्वच्छतेसंदर्भात मडगाव पालिकेचा महत्त्वाचा निर्णय; या कारणासाठी नागरिक, पर्यटकांकडून वसूल केला जाईल दंड

Cash For Job Scam: प्रिया यादवचा आणखी एक कारनामा उघड; डिचोलीतील चार बहिणींना घातला 80 लाखांना गंडा

SCROLL FOR NEXT