Governor Dainik gomantak
गोवा

युवा कवियत्री श्रद्धा गरड यांचा राज्यपालांकडून सत्कार

हंथरुणाला खिळलेल्या अवस्थेत कवितांचे लेखन करून मिळविला साहित्य अकादमी पुरस्कार

दैनिक गोमन्तक

मडगाव : एका असाध्य व्याधीमुळे 75 टक्के अंग लुळे पडल्याने हंथरुणाला खिळून असलेल्या आणि हाताचे केवळ एक बोट चालत असल्यामुळे त्या बोटाने मोबाईलवर कविता टाईप करून त्याचा कविता संग्रह प्रसिद्ध करणाऱ्या साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त युवा कवियत्री श्रद्धा गरड यांची राज्यपाल श्रीधरन पिल्ले यांनी आज तिच्या घरी भेट देऊन अभिनंदन केले.

राज्यपाल (Governor) पिल्ले आज स्वतः गरड यांच्या दवर्ली येथील घरी आले. त्यांनी गरड यांची आपुलकीने विचारपूस केली. नंतर पत्रकारांशी बोलताना, श्रद्धाची कामगिरी अद्वितीय अशा स्वरूपाची आहे. साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्यांचा मी राज भवनात सत्कार ठेवला होता. पण त्या सत्काराला श्रद्धा येऊ शकत नसल्यामुळे मी स्वतः तिच्याकडे आलो आणि तिचा सत्कार केला. हे मी माझे भाग्य समजतो असे त्यांनी सांगितले.

श्रद्धा हिच्या उपचारासाठी राज्यपाल पिल्ले यांनी राज्यपाल निधीतून तिला एक लाख रुपयांची मदतही जाहीर केली. श्रद्धा गरड हिच्या 'काव्य परमळ' या कविता संग्रहाला यंदाचा साहित्य आकादमीचा युवा साहित्यिक पुरस्कार (Award) प्राप्त झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: घरच्यांनी सून म्हणून नाकारलं, ज्याच्यावर जीवापाड प्रेम केलं त्यानचं घात केला; बायकोचा काटा काढणारा नराधम अखेर गजाआड

Viral Video: प्रवाशांची गर्दी अन् चोरट्याचा प्लॅन तयार! दिल्ली मेट्रोमध्ये बिनधास्त चोरी; कॅमेऱ्यात कैद झालेला व्हिडिओ चर्चेत

Saleli Car Fire: सालेलीत कार आगीत जळून भस्‍मसात; 5 लाख रुपयांचे नुकसान; गाडीनं अचानक पेट घेतल्‍यानं खळबळ

Colombia Earthquake: जमीन फाटली अन् इमारती कोसळल्या, डोळ्यांदेखत उडाली दाणादाण! कोलंबियातील भीषण भूकंपात 132 मृत्यू, 1500 हून अधिक घरे उद्ध्वस्त VIDEO

New Head Coach: वर्ल्ड कपच्या तोंडावर मोठा निर्णय; मुख्य प्रशिक्षक बदलला, आता 'या' व्यक्तीवर मोठी जबाबदारी

SCROLL FOR NEXT