Goa Tragic Incident Dainik Gomantak
गोवा

Goa Tragic Incident: काळाचा घाला! पंधरा दिवसांपूर्वीच लग्न ठरलं... आजऱ्यातील तरुणाचा ह्रदयविकाराच्या झटक्याने गोव्यात मृत्यू

Young Man Dies Of Heart Attack In Goa: कोल्हापूरातील आजरा तालुक्यातील एका तरुणाचा ह्रदयविकाराच्या झटक्याने गोव्यात मृत्यू झाला.

Manish Jadhav

Young Man Dies Of Heart Attack In Goa: गोव्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कोल्हापूरातील आजरा तालुक्यातील एका तरुणाचा ह्रदयविकाराच्या झटक्याने गोव्यात मृत्यू झाला. पंधरा दिवसांपूर्वी त्याचे लग्न ठरले होते. लग्न ठरल्यामुळे त्याच्या घरात आनंदाचे वातावरण होते. मात्र अचानक या तरुणाच्या मृत्यूने घरावर दु:खाचा डोंगर कोसळला. मृत तरुणाचे नाव अभिषेक अजित देसाई (वय, वर्ष 31) असे आहे. तो आजारातील शिवाजीनगर येथील रहिवासी होता.

पंधरा दिवसांपूर्वी लग्न ठरलं होतं

दरम्यान, अभिषेकचे वडिल अजित देसाई हे वाटंगी येथील विकास सेवा संस्थेमध्ये काम करतात. तर अभिषेकचा मोठा भाऊ बारामती येथे नोकरीस आहे. अभिषेक हा वाणिज्य शाखेतील पदवीधर होता. तर त्याची होणारी बायकोही गोव्यातीलच (Goa) एका कंपनीत नोकरीस आहे. पंधरा दिवसांपूर्वी, अभिषेकचे लग्न ठरले होते. दिवाळीत एकदम थाटामाटात त्यांचे लग्न होणार होते. मात्र अभिषेकच्या अचानक जाण्याने घरावर शोककळा पसरली.

नेमकं काय घडलं?

सर्दी झाल्याने अभिषेक गोळी घेऊन झोपला होता. पण त्याला झोप लागत नसावी. जेव्हा अचानक छातीत दुखू लागले तेव्हा त्याने तडक होणाऱ्या बायकोला फोन करुन सांगितले. त्यानंतर तातडीने ती आणि तिचे घरचे लोक अभिषेक राहत असलेल्या ठिकाणी पोहोचले. पण आतून दरवाजा बंद होता. आवाज दिल्यानंतरही अभिषेक दरवाजा उघडत नसल्याने त्यांना शंका आली. त्याचवेळी, घरमालकाने पोलिसांना (Police) बोलावून दरवाजा तोडला. मात्र घरातील दृश्य पाहून सगळ्यांनाच धक्का बसला. अभिषेकने रक्ताची उलटी केली होती. त्या ठिकाणी तो निपचित पडला होता.

आई-वडिलांनी हंबरडा फोडला

पंधरा दिवसांपूर्वीच लग्न ठरलेले असताना अभिषेकचे असे अचानक जाणे दोन्ही घराला चटका लावून गेले. अभिषेकला घरामध्ये निपचित पडलेले पाहून आई-वडिलांना हंबरडा फोडला. सायंकाळी अभिषेकवर अंत्यसंस्कार करण्यात आले. अभिषेकच्या पश्चात आई-वडिल, भाऊ-भावजयी असा परिवार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Nightclub Fire: धुरात गुदमरून मृत्यू जवळ आला होता, पण... 'तो' माणूस देवासारखा धावून आला! हडफडे क्लबमधील कझाक डान्सरने सांगितली आपबिती

Goa Egg Price: कसा करायचा ख्रिसमस साजरा? महागाईचा भडका; अंडी - नारळाचे वाढले भाव; जाणून घ्या ताजा दर..

Goa Nightclub Fire: 'हे तर प्रशासनाचे अपयश'! हडफडे दुर्घटनेबाबत राहुल गांधींकडून संवेदना; वाचा महत्वाच्या प्रतिक्रिया..

अग्रलेख: गोव्याच्या पर्यटन इतिहासातील काळा दिवस! ‘रोमिओ' लेन ठरली ‘डेथ' लेन

Partgali Math: पर्तगाळ वर्धापनदिन सोहळ्याची सांगता! मान्यवरांची उपस्थिती; विद्याधीश तीर्थ स्वामीजींचे आशीर्वचन

SCROLL FOR NEXT