National Youth Day | Young Inspirators Network
युवाशक्ती ही सर्वात ज्वलंत शक्ती असून त्यांच्या विचारांची क्रांती घडवून आणण्यासाठी ती सतत क्रियाशील राहणे गरजेचे असते. हीच युवाशक्ती आपल्या विचाराने समाजामध्ये आणि देशामध्ये परिवर्तन घडवून आणू शकते. कोणत्याही देशाचे आगामी भविष्य हे त्यांच्या तरुण पिढीच्या हाती असते.
युवाशक्ती ही जागृत उर्जा असून ती निरंतर वाहत राहणे आवश्यक असते. त्यांच्याकरवी घडणारे प्रत्येक चांगले-वाईट काम देशाचे भवितव्य बनवत असते. म्हणून त्यांच्यावर चांगले संस्कार करणे हे समाजाचे कर्तव्य आहे. ज्वलंत ताकदीच्या स्त्रोताचे प्रतिक म्हणून सुध्दा तरुणांकडे पाहिले जाते; अशावेळी या बळाकडे दुर्लक्ष न करता योग्य ते मार्गदर्शन देऊन हे बळ देशनिर्मितीमध्ये कसे वापरता येईल, याच पार्श्वभूमीवर जाणून घेऊया विद्यार्थ्यांची मते.
आजची युवा पिढी आपल्या विचाराने, आपल्या कृतीने आणि इतरांना प्रेरित करून भविष्यात बदल घडवून आणू शकते. समाजामध्ये सामुदायिक प्रकल्प सुरू करणे असो किंवा वाईट विचारांवर आळा घालण्यासाठी जागृतकता पसरवण्याचे काम असो, ही ताकद फक्त तरुणांमध्येच असते. आणि आजकाल सोशल माध्यमाचा काळ असल्यामुळे युवा हे काम प्रबळपणे करू शकतात. शिक्षण, राजकारण, समाजकल्याण यासारख्या अनेक क्षेत्रामध्ये युवा आपल्या सकारात्मक ऊर्जेने बदल घडवून आणू शकतात.करिश्मा नाईक
युवा ही केवळ शक्ती नसून जगण्यासाठी मिळालेली एक उर्जा आहे . आजच्या तरूण पिढीने जर रचनात्मक विचारांवर आपलं कार्य करत राहण्याचं ठरवलं तर देशात नक्कीच सकारात्मक विचारांचा प्रसार वाढेल. तंत्रज्ञानात विकसित असलेल्या या देशात जर लोकांपर्यंत तंत्रज्ञान कसे आणि कशासाठी वापरतात याची कल्पना पोहोचवली तर नक्कीच या देशात खूप सकारात्मक बदल घडू शकेलआर्या नंदकिशोर देसाई
तरुण पिढी ही होतकरू असते . युवाशक्ती देश विकासाची शिल्पकार आहे. समाज व्यवस्थेत, राजकीय व्यवस्थेत बदल घडवून आणण्याचे काम युवा शक्ति करते. हे बदल फक्त सुजाण व सुसंस्कृत बनवणारे शिक्षण करू शकते. त्यामुळे शिक्षण काय आहे व देश विकसित करण्यासाठी हा घटक कसा महत्त्वपूर्ण आहे हे फक्त युवा शक्तीच पटवून देऊ शकते.स्वराली प्रमोद टेंग्से.
आजची युवापिढी आपल्या नाविन्यपूर्ण कल्पनेतून समाजात क्रांती घडवून आणण्यात सक्षम आहे. संसाधनांची विपुलता जाणून विविध सामाजिक माध्यमांद्वारे देशाची कार्यशक्ती वाढविण्यावर युवकांनी लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. उच्च शिक्षण घेऊन स्वतः सहित देशाचीही प्रगती कशी होईल, या दिशेने वाटचाल सुरू ठेवावी. पुस्तकी ज्ञान पुरेसे नसून व्यावहारिक ज्ञानही तेवढेच महत्त्वाचे आहे हे जाणून घ्यायला हवे. समाज घडविण्यात युवाशक्ती ही एक भारदस्त प्रेरकशक्ती आहे.गुंजन गुरुदास केरकर
युवा हा एक दोलायमान धागा दर्शवतात जो स्वप्ने,आकांक्षा आणि अप्रयुक्त क्षमता एकत्र विणतो.आजची युवा ऊर्जा आणि ताजे दृष्टीकोन यांच्या शक्तिशाली मिश्रणाने सज्ज आहेत आणि ती एक मौल्यवान संपत्ती असू शकते जी देशाच्या भल्यासाठी क्रांती घडवू शकते.भविष्यात परिवर्तन घडवून आणण्यासाठी युवांना पाठबळ मिळणे आणि त्यांना चांगले आरोग्य,प्रशिक्षण आणि शिक्षण प्रदान करणे महत्त्वाचे आहे.कारण राष्ट्रीय विकासाची दंडुका आता युवा पिढीच्या हातात आहे.अक्षदा सावंत देसाई
आपल्या अंगाला जसा पाठीचा कणा महत्वाचा आहे व तो ढासळला तर आपले शरीर काही उपयोगाचे राहत नाही, तसेच जर एका राष्ट्राची युवाशक्ती ढासळली तर ते राष्ट्र संपून जाते. आपली युवा जर कोणत्याही वाईट प्रवृत्तीच्या मोहजाळात किंवा मादक द्रव्यांच्या आहारी अडकली तर ही युवाशक्ती व्यर्थ होऊन जाते. तेव्हा आपणच याच्यावर विचार करा व क्रियाशील बना , व्यसन मुक्त व्हा, सडेतोड आपले विचार मांडात , कर्मठ बनण्याचा प्रयत्न करा .अभिनव सिताराम काटकर
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.