Goa Accident Dainik Gomantak
गोवा

Goa Accident: बंद ट्रकला दुचाकीची मागून धडक, 20 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू; मामाच्या घरुन परतताना काळाचा घाला!

Chikhali Colvale Accident: खली-कोलवाळ मार्गावर रस्त्याच्या बाजूला बंद अवस्थेत उभ्या असलेल्या मालवाहू ट्रकला दुचाकीची पाठीमागून जोरदार धडक

दैनिक गोमन्तक डिजिटल

थिवी : चिखली-कोलवाळ मार्गावर रस्त्याच्या बाजूला बंद अवस्थेत उभ्या असलेल्या मालवाहू ट्रकला दुचाकीची पाठीमागून जोरदार धडक बसल्याने झालेल्या भीषण अपघातात रविश यदुनंद तारी (२०, रा. सांतइस्तेव-तिसवाडी) याचा जागीच मृत्यू झाला. तर, त्याचा मित्र लक्ष्मण भोसले (१८, रा. हळदोणा) हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर गोमेकॉत उपचार सुरू आहेत.

हा अपघात काल सोमवारी रात्री साडेअकराच्या सुमारास घडला. रविश तारी आणि लक्ष्मण भोसले हे दोघे मित्र कामुर्ली येथे मामाच्या घरी गेले होते. तेथून परतत असताना कोलवाळ औद्योगिक वसाहतीतील ‘ग्लेनमार्क’ कंपनीजवळ त्यांच्या दुचाकीची रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक बसली.

या अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले. माहिती मिळताच स्थानिकांनी आणि आपत्कालीन सेवांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना म्हापसा जिल्हा इस्पितळात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी रविश तारी याला मृत घोषित केले. गंभीर जखमी असलेल्या लक्ष्मण भोसले याला पुढील उपचारासाठी गोमेकॉत हलविण्यात आले. पुढील तपास कोलवाळ पोलिस करत आहेत.

चोर्ला घाटात कार उलटली; अनर्थ टळला

कर्नाटकात नोंद झालेल्‍या एका कारचा चोर्ला घाटात अपघात झाला. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्‍याने कार रस्‍त्‍याच्‍या बाजूला उलटली. सुदैवाने चालक आणि गाडीतील इतरांना कोणतीही दुखापत झाली नाही. दरम्‍यान, सध्‍या चोर्ला घाटात मुसळधार पाऊस सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT