Baba Ramdev in Goa
Baba Ramdev in Goa Dainik Gomantak
गोवा

Baba Ramdev in Goa: गोवा हे योगसाधनेसाठी अत्यंत योग्य ठिकाण!

Akshay Nirmale

Baba Ramdev in Goa: योग साधनेसाठी आवश्‍यक असलेला समृद्ध निसर्ग आणि इथले वातावरण गोव्यात आहे. त्यामुळे पर्यटनाची दिशा योगमय आरोग्याकडे वळवून सुदृढ आणि सक्षम नागरिक घडवण्याचे काम गोव्यातून व्हावे, अशी आशा योगगुरू रामदेवबाबा यांनी आज व्यक्त केली.

योगगुरू स्वामी रामदेवबाबा यांच्या मार्गदर्शनाखाली मिरामार किनारी आजपासून तीन दिवसीय योग शिबिराला प्रारंभ झाला. यावेळी कुंडई येथील तपोभूमीचे पीठाधीश्‍वर ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, आमदार प्रेमेंद्र शेट तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. या शिबिराला पहिल्याच दिवशी अपेक्षेहून अधिक प्रतिसाद प्राप्त झाला. आबालवृद्धांनी या शिबिराला हजेरी लावली.

यावेळी रामदेवबाबा म्हणाले की, सर्वांनी दिवसातून किमान एक तास योग करण्याचा संकल्प करावा. सुदृढ आणि सक्षम गोव्‍यासाठी योगसाधनेची आवश्‍यकता आहे. दैनंदिन जीवनात सात्त्विक आहार महत्त्वाचा आहे. घराघरांमध्ये योग आणि आयुर्वेद पोहोचणे गरजेचे आहे.

या शिबिरास अपेक्षेपेक्षा अधिक योगसाधकांनी हजेरी लावल्याने ऐनवेळी योगा करण्यासाठी अतिरिक्त व्यवस्था करण्यात आली. कार्यक्रमस्थळी अतिशय उत्साहपूर्ण वातावरण होते. कोरोना महामारीनंतर ३ वर्षांनंतर पहिल्यांदाच अशा प्रकारच्या मोठ्या शिबिराचे आयोजन राज्यात केले असून याची सुरुवात महाशिवरात्रीसारख्या पवित्रदिनी होत असल्याचे समाधान योगगुरू रामदेव बाबा यांनी व्यक्त केले.

धार्मिक पर्यटनाला प्राधान्य : मुख्यमंत्री

गोवा राज्य जरी निसर्ग पर्यटनासाठी प्रसिद्ध असले तरी आता धार्मिक पर्यटनाला महत्त्व प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील. गोव्यात लवकरच धार्मिक पर्यटन ही संकल्पना रुजविण्यात येईल. योगगुरू रामदेव बाबा यांच्या प्रयत्नांमुळे गोव्यात योग संस्कृतीलाही चालना मिळेल. योगाचे महत्त्व सर्वांपर्यंत पोहोचावे, यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न केले जात आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

आता आरोग्यासाठी गोव्यात या!

गोव्यात केवळ पर्यटनासाठी नव्हे, तर आरोग्यासाठी देखील पर्यटक यावेत. आरोग्य पर्यटन, आयुर्वेदिक पर्यटन, आध्यात्मिक पर्यटनासाठी कार्य करणे गरजेचे आहे. प्रत्येक घरात आयुर्वेद पोहोचणे गरजेचे आहे. राज्यातील सर्व हॉटेल्समध्ये पंचकर्म, षट्कर्म होणे गरजेचे आहे. येथे आलेले पर्यटक हे योगाची दीक्षा घेऊन परतावेत, अशी इच्छा रामदेवबाबांनी व्यक्त केली.

पतंजलीचे केंद्र व्हावे : ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी

भारतीय संस्कृती, आयुर्वेद तसेच ऋषीमुनींच्या परंपरेला सन्मान प्राप्त करून देणाऱ्या योगऋषी रामदेबाबांचे गोमंतभूमीत स्वागत आहे. पोर्तुगीज येण्यापूर्वीची ओळख गोव्याला पुन्हा प्राप्त करून द्यायची आहे. ही भूमी मंगेशाची, शांतादुर्गेची आहे. ही भूमी योगभूमी व्हावी. तिला तिची खरी ओळख मिळावी, यासाठी पतंजलीचे केंद्र गोव्यात स्थापन करावे, असे ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Goa: गोव्यात गृहमंत्री अमित शहांच्या सभास्थळी हृदयविकाराच्या झटक्याने वृद्धाचा मृत्यू

Loksabha Election 2024: दोन वर्षात मायनिंग सुरुळीत होणार, जाहीरनाम्यात मच्छिमार बांधवासाठी अनेक योजना; शाह गोव्यात काय म्हणाले?

Loksabha Election 2024: म्हापसामधून अमित शाह यांचा हल्लाबोल; ''भ्रष्टाचाराने लिप्त इंडिया आघाडी...’’

Loksabha Election 2024: ‘’भ्रष्टाचार, वॉशिंग मशिनचे राजकारण थांबवण्यासाठी अन्...’’; गोव्यातून शशी थरुर यांचा भाजपवर हल्लाबोल

VIDEO: ‘’नोव्हेंबर 2026 मध्ये भारताचे इतके तुकडे होतील...’’, पाकिस्तानी सिनेटरच्या वक्तव्याने वादंग

SCROLL FOR NEXT