St. Inez Panjim Dainik Gomantak
गोवा

Panaji Goa: गोव्यात चाललंय काय? स्मार्ट सिटी पणजीत पुन्हा सापडले गांजाचे झाड

St. Inez Panjim News: सांतिनेज परिसरात पुन्हा एकदा गांजाचं रोप आढळून आलं आहे

Akshata Chhatre

पणजी: काही दिवसांपूर्वी काकुलो मॉल, पणजीच्या परिसरात एक धक्कादायक घटना घडली होती. स्मार्ट सिटीमध्ये रस्त्याच्या कडेला अचानक एक गांजाचं रोप सापडल्याने सगळीकडेच खळबळ उठली होती. अमलीपदार्थ विरोधी पथकाने पूर्ण तपास करून ते रोप गांजाचंच असल्याचं स्पष्ट केलं होतं, त्यांनतर आता पुन्हा एकदा पणजी शहरात हीच घटना घडली आहे आणि यावेळी सांतिनेज परिसरात गांजाचं रोप आढळून आलं आहे.

काही दिवसांपूर्वी सापडलेलं असंच एक रोप अमली पदार्थ विरोधी पथकाने ताब्यात घेतलं असताना आता पुन्हा हा प्रकार कसा काय घडला असं प्रश्नचिह्न निर्माण झालंय.

गांजाची ही छोटी-छोटी रोपं पाहिली म्हणजे या रोपांच्या बिया नेमकं कोण आणून टाकतंय किंवा कधीपासून आणून टाकतंय असा प्रश्न उपस्थित केला जातोय. गोव्याची राजधानी असलेल्या पणजी स्मार्ट सिटीतील शीतल हॉटेल ते मधुबन जंक्शन रस्त्याजवळ हे गांजाचे रोप आढळून आलं असल्याने आता चिंता व्यक्त केली जातेय.

अधिकाऱ्यांनी केली होती चौकशी

शहरात पहिल्यांदा हा विचित्र प्रकार घडताच शहराच्या अधिकाऱ्यांनी काकुलो मॉलजवळच्या परिसरात चौकशी सुरू केली होती. अधिकारी हे रोप स्मार्ट सिटीच्या आवारात कसे आले हे शोधण्याचा प्रयत्न करत होते आणि त्यासाठीच रोप मुळापासून उपटून परीक्षणासाठी पाठवण्यात आलं होतं, त्यापूर्वी या रोपाचं वजन करून आणि आवश्यक तपासणी करून ते रोप गांजाचंच असल्याची खात्री करण्यात आली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT