Yashasvi Jaiswal Dainik Gomantak
गोवा

Yashasvi Jaiswal: 'यशस्वी जयस्वाल' बनला गोव्याचा कर्णधार, सीनियर पुरुष संघाचं करणार नेतृत्व

Goa Cricket Team: २३ वर्षीय डावखुरा फलंदाज २०२५-२६ मोसमात गोव्याच्या सीनियर पुरुष संघाचे नेतृत्व करेल

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: कसोटीपटू यशस्वी जयस्वाल मुंबई क्रिकेट संघटनेकडून ना हरकत दाखला (एनओसी) मिळवून गोवा क्रिकेट संघटनेकडून आगामी मोसमात ‘पाहुणा’ क्रिकेटपटू या नात्याने खेळण्यास सज्ज झाला आहे.

२३ वर्षीय डावखुरा फलंदाज २०२५-२६ मोसमात गोव्याच्या सीनियर पुरुष संघाचे नेतृत्व करेल, असे गोवा क्रिकेट असोसिएशनचे सचिव शंभा नाईक देसाई यांनी बुधवारी संध्याकाळी जाहीर केले. यशस्वी जयस्वाल मुंबई क्रिकेट असोसिएशनची ‘एनओसी’ गोवा क्रिकेट असोसिएशनला सादर करेल.

यशस्वीनं झालेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये चांगली कामगिरी केली होती. त्याने पाच कसोटी सामन्यांमध्ये ४३.४४ च्या सरासरीने ३९१ धावा केल्या, परंतु आयपीएल २०२५ मध्ये त्याची कामगिरी चांगली राहिलेली नाही. राजस्थान रॉयल्सकडून खेळताना त्याने तीन सामन्यात फक्त ३४ धावा केल्या आहेत.

यशस्वीने २०१९ मध्ये मुंबईसाठी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून तो संघासाठी एक महत्त्वाचा खेळाडू आहे. त्याने ३६ सामन्यांमध्ये १२ शतके आणि १२ अर्धशतकांसह ३,७१२ धावा केल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मोपा विमानतळावर कस्टम विभागाची मोठी कारवाई! 3.16 कोटींचा अंमली पदार्थ जप्त; बँकॉकहून आलेल्या प्रवाशाला बेड्या

Rivona: सफर गोव्याची! पांडवांचा पदस्पर्श लाभलेले, देवदेवतांची प्राचीन मंदिरे असणारे तपस्वींचे ऋषीवन; हिरवेकंच 'रिवण'

Youth Migration: भारतीयांना खुणावतेय परदेशातील करिअर! 52 टक्के तरुणांचा देश सोडण्याचा विचार; 'टर्न ग्रुप'चा खुलासा

किंग कोहली अन् रोहितच्या फौजेचं व्यवस्थापन आता गोमंतकीयाच्या हाती, महेश देसाईंची टीम इंडियाच्या व्यवस्थापकपदी निवड

मुंबईत मराठी माणूस खरंच श्रीमंत झाला की फक्त 'उपरा'? 25 वर्षांच्या सत्तेचा लेखाजोखा अन् वास्तव; आगामी निवडणुकीत कोणाला कौल?

SCROLL FOR NEXT