Goa Politics, NSUI Allegations Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: झेवियर्स तणाव, गुंडागर्दीमागे मुख्यमंत्र्यांचा हात : ‘एनएसयुआय’चा गंभीर आरोप

याप्रकरणी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात येईल, ‘एनएसयुआय’चे गोवा निमंत्रक नौशाद चौधरी

गोमन्तक डिजिटल टीम

विद्यार्थी मंडळ स्थापनेवरून म्हापशातील सेंट झेवियर्स महाविद्यालयात शनिवारी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी घातलेला गोंधळ, प्राध्यापक-प्राचार्य यांच्याशी केलेले गैरवर्तन आणि विद्यार्थ्यांना दिलेल्या धमक्या यामागे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा हात असल्याचा गंभीर आरोप करत आज काँग्रेसप्रणीत नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियाने जाहीर निषेध केला आहे. Goa Politics

याप्रकरणी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती ‘एनएसयुआय’चे गोवा निमंत्रक नौशाद चौधरी यांनी आझाद मैदानावर दिली.

चौधरी म्हणाले, ‘अभाविप’च्या विद्यार्थी नसलेल्या कार्यकर्त्यांनी सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये तब्बल ४ तास धरणे आंदोलन करून संपूर्ण व्यवस्थापनास वेठीस धरले. नियमित वर्ग, विज्ञान प्रयोग सराव (प्रॅक्टिकल्स) बंद पाडले.

प्राध्यापक, प्राचार्यांशी गैरवर्तन केले आणि या आंदोलनात सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना धमकावले. आरएसएस आणि अभाविप जातीय आणि धार्मिक विकेंद्रीकरणाची, द्वेष पसरवणारी विचारधारा विद्यार्थ्यांवर थोपवू पाहात आहे, याचा एनएसयुआय जाहीर निषेध करत आहे.

या विरोधात कठोर कारवाईची अपेक्षा आहे. मात्र, आंदोलनाला मुख्यमंत्री सावंत जबाबदार असून आहेत, त्याचे काही पुरावे आमच्याकडे आहेत. या पुराव्यानिशी आम्ही पोलिसांमध्ये संबंधित आंदोलकांवर गुन्हा नोंदवणार आहोत, असेही चौधरी म्हणाले.

आंदोलकांनी घेतली होती मुख्यमंत्र्यांची भेट

‘आरएसएस’ची विचारधारा बाळगणारी ‘अभाविप’ संघटना धार्मिक द्वेषाचा अजेंडा शैक्षणिक संस्थांमध्ये पसरवू पाहात आहे. त्याचाच हा परिपाक असून या आंदोलनातील आंदोलकांनी नुकतीच मुख्यमंत्री डॉ. सावंत यांची भेट घेतल्याचे पुरावे आहेत.

संबंधितांनी ते ‘ट्विटर’वरही टाकले आहेत. यात राज्याबाहेरील काहीजण सहभागी असून त्यांचा विद्यार्थी संघटनेशी काहीही संबंध नाही, असेही चौधरी म्हणाले

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mitchell Starc Fight: लाईव्ह सामन्यात 'रनिंग लाईन'वरुन राडा! मिचेल स्टार्क मेहदी हसन मिराजशी भिडला; हाय-व्होल्टेज ड्रामा व्हायरल

Goa Olympic Association: 'गोवा ऑलिंपिक'ला 21 वर्षांनंतर लाभणार नवा सचिव, गुरुदत्त भक्ता यांची दोन दशकांची कारकीर्द; महत्त्वाच्या स्पर्धांचे राज्यात आयोजन

Shukra Pushkaransh Yog 2026: शुक्रदेवांची अफाट कृपादृष्टी! 15 ऑगस्टपासून 'या' राशींच्या नशिबाला मिळणार नवी दिशा; 'शुक्र पुष्करांश' योग करणार मालामाल

Calangute Dance Bar: कळंगुटमधील 'डान्स बार' बंद करा, गट काँग्रेस समितीची मागणी; पोलिसांना निवेदन सादर

Child Disappearance Goa: राज्यात पाच वर्षांत हरवली 256 मुले, 106 सापडली,150 बेपत्ता

SCROLL FOR NEXT