WRITER AKANSHA NAIK's BOOK PUBLISHED Dainik Gomantak
गोवा

Pernem News : साहित्यातील शक्तीतूनच लेखकाचे अस्तित्व घडते : सुलक्षणा सावंत

युवा लेखिका आकांक्षा नाईक यांचे 'अनंतलीन' पुस्तक प्रकाशित

दैनिक गोमन्तक डिजिटल

साहित्य हे कायमस्वरूपी असते, त्याचा कधीही नाश होत नाही. साहित्यात जी ताकद आहे, त्या बळावरच साहित्यिक आपले अस्तित्व निर्माण करतो, असे प्रतिपादन गोवा प्रदेश महिला मोर्चाच्या अध्यक्ष सुलक्षणा प्रमोद सावंत यांनी केले.

कासारवर्णे येथील नवोदित लेखिका आकांक्षा अनंत नाईक यांच्या पहिल्याच ‘अनंतलीन’ या ललित लेख संग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यात प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या.

कासारवर्णे येथील श्री महादेव मंदिराच्या सभा मंडपात आयोजित केलेल्या कार्यक्रमाला पेडणे मतदारसंघाचे आमदार प्रवीण आर्लेकर, प्रा. अनिल सामंत, शिक्षक राजमोहन शेट्ये, कासारवर्णेचे सरपंच नवनाथ नाईक, पंच सदस्य अवनी गाड, अक्षया अनंत नाईक, मुकुंद सडेकर, साहील नारुलकर आदी उपस्थित होते.

साहिल नारुलकर यांनी स्वागत आणि सूत्रसंचालन केले. अल्पिता नाईक, किशोरी धारगळकर, विनोद नाईक आदींनी पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

सावंत म्हणाल्या की, साहित्य पुढील समाजाची दिशा ठरवत असते. त्यामुळे लेखक हा विचार करूनच लेखन करतो. लेखकाच्या साहित्यात जी ताकद असते, ती इतर कुठल्याही क्षेत्रात नाही. मुकुंद सडेकर यांनी प्रास्ताविक केले. लेखिका आकांक्षा नाईक, प्रा. अनिल सामंत, राजमोहन शेट्ये यांनीही मनोगत व्यक्त केले.

लेखिकेला नोकरीची ग्वाही

लेखिका आकांक्षा नाईक यांनी जीवनात अनेक वादळे आणि दुःखांचा सामना केला आहे, याची मला जाणीव आहे. त्यामुळे त्यांना नोकरी मिळवून देण्यासाठी माझे शंभर टक्के प्रयत्न असतील. लेखिकेने दुःखी होऊन चालणार नाही. प्रत्येकाच्या जीवनात दुःखाचे पडसाद उमटतात. परंतु त्यातून सावरण्याची गरज आहे, असे सांगून आमदार प्रवीण आर्लेकर यांनी नाईक यांना नोकरीची ग्वाही दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT