831 females per thousand males in rural areas of Goa Dainik Gomantak
गोवा

चिंताजनक! ग्रामीण भागात हजार पुरुषांमागे 831 महिला

चिंताजनक : शहरी भागात दिलासादायक प्रमाण; हजार पुरुषांमागे 999 महिला

दैनिक गोमन्तक

पणजी: राज्यातील ग्रामीण भागातील लिंग गुणोत्तर प्रमाण 1 हजार पुरुषांमागे 831 महिला असे असल्याचे निदर्शनास आले आहे. तर, शहरातील लिंग गुणोत्तर प्रमाण मात्र दिलासादायक असून, त्यात 1 हजार पुरुषांमागे 999 महिलांचे प्रमाण असल्याचे नोंदले गेले आहे.

(Worrying! 831 females per thousand males in rural areas of Goa)

केंद्रीय सांख्यिकी आणि उपक्रम मंत्रालयाच्या वतीने जाहीर झालेल्या पिरियॅडिक लेबर फोर्स सर्वेक्षणानुसार (पीएलएफएस) हे प्रमाण नोंदले गेले आहे. राज्याचे सरासरी लिंग गुणोत्तर प्रमाण हे 929 असे आहे.

बेरोजगारी टक्केवारी वाढतेय

राज्याचा एकूण बेरोजगारीचा दर 10.5 टक्के असा नोंदविला गेला आहे. ही टक्केवारी राष्ट्रीय बेरोजगारीच्या 4.2 टक्क्यांपेक्षा अडीचपट अधिक आहे.

केंद्रीय सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने जुलै 2020 ते जून 2021साठी पीएलएफएसच्या वार्षिक अहवाल जारी केला.

गोव्याच्या ग्रामीण आणि शहरी भागात बेरोजगारीचा दर कमी-अधिक प्रमाणात समान आहे. ग्रामीण भागात बेरोजगारीचा दर दहा टक्के आणि शहरी भागात 10.9 टक्के असा नोंदविला गेला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT