World Photography Day: दरवर्षी 19 ऑगस्ट रोजी जागतिक फोटोग्राफी दिन साजरा केला जातो. लोकांना फोटोग्राफीची भूमिका समजावी आणि त्याचा उद्देश समजावा यासाठी हा दिन साजरा केला जातो. फोटोग्राफी कला आणि तांत्रिक ज्ञान यांचा संगम आहे. फोटोग्राफीद्वारे आपण जग रंजकपणे कॅमेरॅत कॅप्चर करू शकतो.
जागतिक फोटोग्राफी दिनानिमित्त जुन्या काळात काढलेले गोव्यातील काही दुर्मिळ फोटो आपण पाहणार आहोत.
दक्षिण गोव्यातील एक प्रमुख धरण असलेल्या साळवली धरण बांधण्यापूर्वी धरण क्षेत्रात येणाऱ्या कुर्डी गावाचे स्थलांतर करण्यात आले. कुर्डी गावाचे स्थलांतर होण्यापूर्वी 1920 मध्ये काढलेला या गावाचा फोटो.
पणजीतील मिरामार बीच पर्यटकांमध्ये प्रसिद्ध आहे. आता टकाटक दिसणारा मिरामार बीच 1970 च्या दरम्यान, असा दिसत होता.
झुआरी नदीवरील बोरी पूल 1938 मध्ये घेतलेले छायाचित्र
सतत बसची वर्दळ असणाऱ्या पणजी बसस्थानकाचा 1950 मध्ये काढलेला एक दुर्मिळ फोटो.
मुरगाव पोर्टचा 1913 मध्ये घेतलेला फोटो, इंडिया पोर्तुगिजा या पुस्तकात हा फोटो आहे.
मडगाव शहराचा 1950 मध्ये घेतलेला एक फोटो.
वास्को शहर आता स्टेशन परिसर, पोर्ट, मार्केट अशा विळख्यात असले तरी 1960 मध्ये घेतलेला वास्को शहरातील पंपाचा एक फोटो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.