World Homeopathy Day Celebrated Dainik Gomantak
गोवा

World Homeopathy Day 2023 : होमिओपॅथी एक विश्‍‍वसनीय उपचार पद्धती

डॉ. मर्लिन तेलीस : ‘जागतिक होमिओपॅथी दिना’निमित्त पोस्‍टर्स स्पर्धेतून दिला संदेश

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव : हाेमिओपॅथी ही एक विश्वसनीय अशी उपचार पद्धती असून अनेक रोगांवर या उपचार पद्धतीतून नियंत्रण आणता येते, असा दावा डॉ. मर्लिन तेलीस यांनी केला. दक्षिण गाेवा जिल्‍हा इस्‍पितळात सोमवार, १० रोजी जागतिक होमिओपॅथी दिन साजरा करण्‍यात आला. त्‍यावेळी त्या बोलत होत्या.

या जागतिक होमिओपॅथी दिनाच्‍या निमित्ताने पोस्‍टर्स स्‍पर्धा आयोजित करण्‍यात आली होती. होमिओपॅथी एकात्‍मिक औषधासाठी रोड मॅप असा विषय होता. या पोस्‍टर्सद्वारे होमिओपॅथी औषधांच्‍या इतर प्रणालींना पूरक ठरू शकते. परिणामी रुग्‍णांची चांगली पुनर्प्राप्‍ती होऊ शकते, असा संदेश देण्‍यात आला. या कार्यक्रमानंतर मोफत होमिओपॅथी वैद्यकीय शिबिर घेण्‍यात आले. त्‍याचा १३० रुग्‍णांनी लाभ घेतला.

जगातील दुसरी लोकप्रिय प्रणाली

तेलीस म्‍हणाल्या की, होमिओपॅथी ही जगातील दुसरी सर्वांत लोकप्रिय प्रणाली आहे. अलीकडच्‍या काळात जगभरात मधुमेह, उच्‍च रक्‍तदाब, हृदय व रक्‍तवाहिन्‍यांसंबंधी रोग तसेच क्रॉनिक रेनल फेल्‍युअर इत्‍यादींसारख्‍या दुर्धर आजारांनी ग्रस्‍त लोकांची संख्या वाढली आहे. या आजारांचे स्वरूपही बदलले आहे.

औषधांचे प्रतिकूल परिणाम आणि औषधांचा प्रतिकार यासारख्‍या इतर समस्‍या आहेत. यातील बहुतांश रोग बहुगुणात्‍मक आहेत. कोणीही यात सहजपणे हस्‍तक्षेप करू शकत नाही. त्‍यामुळे त्‍याला बहुघटक दृष्‍टिकोन किंवा एकात्‍मिक दृष्‍टिकोन आवश्‍‍यक आहे. होमिओपॅथी हे त्‍याच्‍या सर्वांगीण उपचारांमुळे एक विश्‍‍वसनीय औषध बनले आहे. - डॉ. मर्लिन तेलीस

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: "आम्ही भारतीय आहोत, आम्हाला चायनीज म्हणू नका!" अरुणाचलच्या चिमुकलीचा व्हिडिओ पाहून पाणावले देशवासीयांचे डोळे

Goa Parra Road: 'डियर जिंदगी रोड'वर पर्यटनाची नवी लाट! आलिया-शाहरुखच्या सायकलिंग दृश्याने पर्रा-माडानी रस्‍त्‍याला देशभरात ओळख

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बुध, गुरु आणि मंगळाची महायुती! 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठा ट्विस्ट; हाती लागणार कुबेराचा खजिना

Chief Election Commissioner: मुख्य निवडणूक आयुक्त येणार गोव्यात, 2 व 3 सप्टेंबरला दौरा; निवडणुकीच्या दृष्टीने अधिकाऱ्यांना करणार मार्गदर्शन

न्यू यॉर्कच्या सिप्रियानी वॉल स्ट्रीटवर भारतीय संस्कृतीचा डंका! 'भारत बियॉन्ड बॉर्डर 2.0' गाला संपन्न; सिनेकलाकारांची विशेष उपस्थिती

SCROLL FOR NEXT